सध्यास्थितीत अंतिम वर्षाच्या परीक्षा घेणे शक्य नाही ....

सध्या स्थितीत कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे अंतिम वर्षांच्या परीक्षा न घेण्याचा निर्णय घेणात आला आहे , असे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले.

सध्यास्थितीत अंतिम वर्षाच्या परीक्षा घेणे शक्य नाही ....

सध्यास्थितीत अंतिम वर्षाच्या परीक्षा घेणे शक्य नाही ....

मुंबई : राज्यातील कोविड-१९ चा वाढता प्रभावामुळे सद्यस्थितीत रुग्णांच्या संख्येत दररोज मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. त्यामुळे विद्यापीठ अनुदान आयोगाच्या सुधारित मार्गदर्शक सूचनांनुसार अंतिम वर्षाच्या परीक्षा घेणे सध्याच्या कोरोना परिस्थितीमुळे शक्य नाही. या पार्श्वभूमीवर मागील काही बैठकींमध्ये राज्यात अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा न घेण्याच्या निर्णयावर राज्य शासन ठाम असल्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले.

सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीत राज्यातील कोविड-१९ चा वाढता प्रादुर्भाव आणि अंतिम वर्षाच्या परीक्षा संदर्भात आढावा घेऊन सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यानंतर मंत्रालयात झालेल्या पत्रकार परिषदेत उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

परीक्षा घेऊच नये किंवा त्या रद्द केल्या आहेत अशी शासनाची भूमिका नाही तर राज्यातील कोविड-१९ चा वाढता प्रादुर्भाव पहाता आत्ताच्या परिस्थितीत परीक्षा घेणे योग्य होणार नाही ही शासनाची भूमिका असल्याची माहिती सामंत यांनी दिली. सर्व १३ अकृषी विद्यापीठाच्या कुलगुरूंनी सध्याच्या परिस्थितीत परीक्षा घेणे उचित होणार नाही हे शासनाला लेखी कळवले आहे.