भिवंडी तालुक्यातील दाभाड ग्रामपंचायत हद्दीत गुरचरण जागेवर अतिक्रमण...| स्थानिक प्रशासन कारवाई करण्यास करते टाळाटाळ...

भिवंडी तालुक्यातील दाभाड ग्रामपंचायत हद्दीत गुचरण जागेवर गावातील रहिवासीनी व्यावसायिक कारणासाठी उपयोग करून या जागेवर अनधिकृत बांधकाम केला असताना हे अनधिकृत बांधकाम पाडण्यास प्रशाकीय अधिकारी टाळाटाळ करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

भिवंडी तालुक्यातील दाभाड ग्रामपंचायत हद्दीत गुरचरण जागेवर अतिक्रमण...| स्थानिक प्रशासन कारवाई करण्यास करते टाळाटाळ...
Encroachment on Gurcharan land in Dabhad Gram Panchayat boundary of Bhiwandi taluka ... | The local administration avoids taking action ...

भिवंडी तालुक्यातील दाभाड ग्रामपंचायत हद्दीत गुरचरण जागेवर अतिक्रमण...

 स्थानिक प्रशासन कारवाई करण्यास करते टाळाटाळ...

भिवंडी तालुक्यातील दाभाड ग्रामपंचायत हद्दीत गुचरण जागेवर गावातील रहिवासीनी व्यावसायिक कारणासाठी उपयोग करून या जागेवर अनधिकृत बांधकाम केला असताना हे अनधिकृत बांधकाम पाडण्यास प्रशाकीय अधिकारी टाळाटाळ करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

    सदर ग्रामपंचायत दाभाड हद्दीतील ग्रामपंचायतीच्या ताब्यात असलेल्या गुचरण सव्हे क्र. 65 मध्ये दाभाड गावातील रहिवासी यशवंत शंकर पाटील व भालचंद्र लडकू पाटील यांनी अतिक्रमण करुण व्यावसायिक कारणासाठी या जागेचा विना परवाना वापर केला आहे.

    परंतु हे अनधिकृत बांधकाम निष्काशीत करण्यास संदर्भात तहसीलदार भिवंडी यांनी गटविकास अधिकारी पंचायत समिती भिवंडी यांना पत्र लिहुन कारवाई करण्याचे आदेश दिले होते.परंतु आज एक वर्ष उलटूनही कारवाई करण्यास प्रशासकीय अधिकारी टाळटाळ करत असल्याचा आरोप ग्रामस्थ अशोक पाटील यांनी केला आहे.

    महाराष्ट्र शासनाच्या महसूल व  वनविभागाने गायरान जमिनीचे संरक्षण करण्याचा व जागेवर अतिक्रमन न होवून अधिकार ग्रामपंचायतीला दिला असल्याचा  शासन निर्णय असताना सुद्धा स्थानिक ग्रामपंचायत व प्रशासकीय अधिकारी हे अनाधिकृत बांधकाम का पाडत नाही असा सवाल परिसरातील नागरिक करत आहेत.
 
'' आम्ही हे अतिक्रमण निष्कासित करण्यासाठी पोलीस प्रशासनाला पोलीस बंदोबस्ता साठी पत्र दिले आहे परंतु आतापर्यंत पोलिस बंदोबस्त न मिळाल्याने कारवाई झालेली नाही.पोलिसांनी बंदोबस्त मिळाल्यानंतर आम्ही कारवाई करणार आहोत."

डॉ. प्रदीप घोरपडे

गटविकास अधिकारी पंचायत समिती भिवंडी

भिवंडी

प्रतिनिधि - सत्यवान तरे

___________