स्वाभिमानी मुप्टा पूर्ण ताकतीने पदवीधर मतदारसंध निवडणूक लढवणार - प्रोफेसर शंकर अंभोरे...| मराठवाड्यातील शिक्षक प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचार्यांच्या 8 संघटना यांचा जाहीर पाठिंबा...
स्वाभिमानी मुप्टा संघटनेचे ची औरंगाबाद येथे महत्वपूर्ण बैठक घेण्यात आली बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. किशोर साळवे होते तर बैठकीला मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, नांदेड, परभणी, हिंगोली, लातूर या सर्व जिल्हाध्यक्ष, सचिव, कार्याध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते. सर्व पदाधिकाऱ्यांच्या प्रतिक्रिया व विचार-विनिमय अंती सर्वानुमते असे ठरले की, मराठवाडा पदवीधर मतदार निवडनुक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष, प्रोफेसर शंकर अंभोरे हे लढवणार आहेत.

स्वाभिमानी मुप्टा पूर्ण ताकतीने पदवीधर मतदारसंध निवडणूक लढवणार - प्रोफेसर शंकर अंभोरे...
मराठवाड्यातील शिक्षक प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचार्यांच्या 8 संघटना यांचा जाहीर पाठिंबा...
औरंगाबाद दि. ०८ : स्वाभिमानी मुप्टा संघटनेचे ची औरंगाबाद येथे महत्वपूर्ण बैठक घेण्यात आली बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. किशोर साळवे होते तर बैठकीला मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, नांदेड, परभणी, हिंगोली, लातूर या सर्व जिल्हाध्यक्ष, सचिव, कार्याध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते. सर्व पदाधिकाऱ्यांच्या प्रतिक्रिया व विचार-विनिमय अंती सर्वानुमते असे ठरले की, मराठवाडा पदवीधर मतदार निवडनुक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष, प्रोफेसर शंकर अंभोरे हे लढवणार आहेत.
आज रोजी झालेल्या बैठकीमध्ये सर्व पदाधिकाऱ्यांनी एकमताने असा निर्णय घेतला. स्वाभिमानी मुप्टा संघटनेची वैचारिक बांधिलकी ही फुले-शाहू-आंबेडकर यांच्या त्यानंतर विचारांवर चालणारी आहे. स्वाभिमानी मुप्टा संघटना ही मराठवाड्यातील विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे प्रश्न सोडवणारी झुंजार संघटना आहे.
संघटनेने आज पर्यंत, अनेक विद्यार्थी शिक्षक व प्राध्यापकांचे प्रश्न मार्गी लावलेले आहेत यामध्ये विद्यार्थ्यांसाठी स्वधार योजना, शिक्षकांसाठी चे अनुदानाचे प्रश्न, प्राध्यापक नियुक्तीतील आरक्षण धोरण इत्यादी मुद्द्यांवर ठोस भूमिका घेऊन निर्णय प्राप्त केलेली आहे. या बैठकीला स्वाभिमानी मुप्टा संघटनेचे संस्थापक कार्याध्यक्ष प्राचार्य किशोर साळवे, संस्थापक सचिव विलास पांडे, संघटनेचे जेष्ठ नेते प्रोफेसर डॉ. दादासाहेब राजहंस, प्रा. डॉ. रायपुरे, व सर्व जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
बीड
प्रतिनिधी - विश्वनाथ शरणांगत
_________