आरएसपी युनिट व दिव्य सेवाभावी संस्थेतर्फे वाहनचालक कार्यशाळा संपन्न...

संभव फाउंडेशन आणि टोटल ऑईल कंपनी यांच्यातर्फे मोहने येथे  परिवहन उपविभागीय अधिकारी चव्हाण व वरिष्ठ वाहतूक पोलीस निरीक्षक सुखदेव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली टू व्हीलर चालकांची मोहने येथे नालंदा बुद्ध विहारात कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.

आरएसपी युनिट व दिव्य सेवाभावी संस्थेतर्फे वाहनचालक कार्यशाळा संपन्न...
Driving workshop conducted by RSP unit and Divya Sevabhavi Sanstha.
आरएसपी युनिट व दिव्य सेवाभावी संस्थेतर्फे वाहनचालक कार्यशाळा संपन्न...

आरएसपी युनिट व दिव्य सेवाभावी संस्थेतर्फे वाहनचालक कार्यशाळा संपन्न...    

कल्याण : संभव फाउंडेशन आणि टोटल ऑईल कंपनी यांच्यातर्फे मोहने येथे  परिवहन उपविभागीय अधिकारी चव्हाण व वरिष्ठ वाहतूक पोलीस निरीक्षक सुखदेव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली टू व्हीलर चालकांची मोहने येथे नालंदा बुद्ध विहारात कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.

 कार्यक्रमाच्या सुरवातीला आरएसपी अधिकारी शिक्षक युनिटचे कमांडर मणिलाल शिंपी सर यांनी वाहतुकीचे नियम व वाहनचालकांनी घ्यायची काळजी याविषयी मार्गदर्शन केले.  अनंत किनगे आरएसपी अधिकारी यांनी वाहतुकी संदर्भात कायदेविषयक माहिती देताना सांगितले की दुचाकी स्वार यांनी गाडी चालवताना हेल्मेट वापरणे बंधन कारक आहे तसेच गाडीच्या विषयी माहिती देताना भरधाव वेगाने गाडी चालवण्याचे दुष्परिणाम व होणारे हानी याविषयी माहिती दिली.

संभव फाउंडेशनच्यावतीने राकेश पाटील यांनी व्हिडिओद्वारे वाहतुकीचे सिग्नल व अपघाताचे संकेत आणि वाहनचालकांना कायदेविषयक माहिती दिली. या कार्यशाळेत मोहने आंबिवली गाळेगाव अटाळी परिसरातील सुमारे १००  वाहन चालकांनी सहभाग घेतला होता. यावेळी वाहनचालकांना कोरोना किट, रेशन किट तसेच प्रशिक्षण प्रमाणपत्र देण्यात आले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी दिव्य सेवाभावी संस्था व त्यांचे सदस्य,  नालंदा बुद्ध विहार समितीचे सचिव बी. एफ. वाघमारे यांनी मोलाचे सहकार्य केले.

 आरएसपी अधिकारी युनिटचे बंशीलाल महाजन, जितेंद्र सोनवणे, अनंत किनगे तसेच संभव फाऊंडेशनचे टेक्निशियन रुपेश पाटील, जिग्नेश पाटील, सुनीता विश्वे, लीना पाठवले, विजय खेत्रे, मीरा इंदाटे, रत्नमाला गायकवाड, सुरेखा खुडे यांच्यासह सह संस्थापक निलेश ठोंबे यांनी विशेष परिश्रम घेतले.

कल्याण, ठाणे 

प्रतिनिधी - कुणाल म्हात्रे 

___________