आमदारच्या गाडीच्या अपघातात दोन जणांच्या मुत्यु प्रकरणी वाहन चालकाची जामिनावर मुक्तता...        

कल्याण तालुका ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत रविवारी दहागाव जवळ भाजप आमदार किसन कथोरे यांच्या गाडीने एका दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार एक तरुण आणि एका तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

आमदारच्या गाडीच्या अपघातात दोन जणांच्या मुत्यु प्रकरणी वाहन चालकाची जामिनावर मुक्तता...        
Driver released on bail in case of death of two persons in MLA's car accident ...

आमदारच्या गाडीच्या अपघातात दोन जणांच्या मुत्यु प्रकरणी वाहन चालकाची जामिनावर मुक्तता...              

कल्याण :  कल्याण तालुका ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत रविवारी दहागाव जवळ भाजप आमदार किसन कथोरे यांच्या गाडीने एका दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार एक तरुण आणि एका तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. टिटवाळा ग्रामीण पोलिसांनी याप्रकरणी आरोपी कार चालकांस अटक करीत सोमवारी कल्याण जिल्हा सत्र नान्यालयात हजर केले असता जामिनावर मुक्तता करण्यात आली.             

रविवारी संध्याकाळच्या सुमारास दहागाव नजीक आमदार किसन कथोरे यांच्या कार आणि मोटारसायकलच्या धडकेत कल्याण मधील पिसवली परिसरात राहणारा अमित नंदकुमार सिंग आणि  त्यांच्या सबोत असलेली तरूणी सिमरन सिंग या दोघांचा भीषण अपघातात मुत्यु झाला.  

पोलीस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार,  टिटवाळा पोलिसांनी कार चालक  किरण भोपी वय (२९) वर्षे यांस अपघात प्रकरणी अटक करीत सोमवारी कल्याण  जिल्हा सत्र नान्यालयात हजर केले असता न्यायालयाने जमिनावर मुक्तता केली.

कल्याण, ठाणे

प्रतिनिधी - कुणाल म्हात्रे 

___________