डॉ. विकास आबनावे यांचे कार्य पुढे नेणार...

"महाराष्ट्र विद्यार्थी सहायक मंडळाच्या विस्तारात व प्रगतीत डॉ. विकास आबनावे यांचे योगदान मोलाचे होते. यासह त्यांचे राजकीय, सामाजिक, साहित्यिक, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील योगदान उल्लेखनीय राहिले. त्यांच्या अकाली जाण्याने त्यांनी घेतलेले हे सर्वांगीण कार्याचे व्रत पुढे नेणार आहे. डॉ. आबनावे यांच्या व्यक्तिमत्वाला साजेसे कार्य येत्या काळात आपण सर्व मिळून करू," असा विश्वास महाराष्ट्र विद्यार्थी सहायक मंडळाचे नवनिर्वाचीत सचिव प्रसाद आबनावे यांनी व्यक्त केला.

डॉ. विकास आबनावे यांचे कार्य पुढे नेणार...
Dr. Vikas Abnave will continue the work...
डॉ. विकास आबनावे यांचे कार्य पुढे नेणार...
डॉ. विकास आबनावे यांचे कार्य पुढे नेणार...

डॉ. विकास आबनावे यांचे कार्य पुढे नेणार...

- प्रसाद आबनावे; 'नवी उमेद नवी दिशा विकासपर्व १००' कार्यक्रमाचे उद्घाटन 
- अरुण खोरे, मोहन जोशी, डॉ. गंगवाल यांची मानद सल्लागारपदी नियुक्ती 

पुणे : "महाराष्ट्र विद्यार्थी सहायक मंडळाच्या विस्तारात व प्रगतीत डॉ. विकास आबनावे यांचे योगदान मोलाचे होते. यासह त्यांचे राजकीय, सामाजिक, साहित्यिक, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील योगदान उल्लेखनीय राहिले. त्यांच्या अकाली जाण्याने त्यांनी घेतलेले हे सर्वांगीण कार्याचे व्रत पुढे नेणार आहे. डॉ. आबनावे यांच्या व्यक्तिमत्वाला साजेसे कार्य येत्या काळात आपण सर्व मिळून करू," असा विश्वास महाराष्ट्र विद्यार्थी सहायक मंडळाचे नवनिर्वाचीत सचिव प्रसाद आबनावे यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्र विद्यार्थी सहायक मंडळाच्या शताब्दीपूर्तीचे औचित्य साधून 'नवी उमेद, नवी दिशा, विकासपर्व मिशन १००' या कार्यक्रमाचा शुभारंभ नुकताच करण्यात आला. यावेळी डॉ. विकास आबनावे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. तसेच प्रसाद आबनावे यांचा निवडीनिमित्त सत्कार करण्यात आला. 'विकासपर्व' कार्यक्रमाच्या निमित्ताने संस्थेवर काही नियुक्त्या करण्यात आल्या. यामध्ये मानद सल्लागार मंडळात जेष्ठ पत्रकार अरुण खोरे (पत्रकारिता), माजी आमदार मोहन जोशी (राजकीय), डॉ. पारितोष गंगवाल (आरोग्य विज्ञान), दिलीप गायकवाड (वाणिज्य), ऍड. मुकेश परदेशी (विधी धर्मदाय), उत्तम जाधव (प्रशासकीय) यांचा समावेश आहे. तर राजेंद्र पंढरपुरे (प्रसिद्धी समन्वयक), जीवराज चोले (प्रसिद्धी प्रमुख), उदय लेले (प्रसिद्धी सहाय्यक) आदींचा समावेश आहे.  

टिळक रस्त्यावरील संस्थेच्या अशोक विद्यालयात झालेल्या या कार्यक्रमावेळी संस्थेच्या चेअरमन सुमन घोलप, उपाध्यक्षा पी. डी. आबनावे, सचिव प्रसाद आबनावे, संस्थेचे कार्यकारिणी सदस्य प्रथमेश आबनावे व पुष्कर आबनावे उपस्थित होते. संस्थेचे पेट्रोन्स म्हणून ज्येष्ठ शिक्षकांना नियुक्त करण्यात आले. त्यामध्ये भागूजी शिखरे, धोंडिबा तरटे, विकास दळवी, दस्तगीरी मणेर, राहुल कांबळे, दिनकर सोनावणे, सुशांत देशपांडे, अजित जाधव, शहनाज शेख, रेखा दराडे, कल्याणी साळुंखे, शबाना खान, प्रमोदिनी कुदळे, विद्या कांबळे, सुनीता ननावरे आदींचा समावेश आहे. संस्थेच्या सर्व शाळांच्या वतीने सचिवपदी निवडीबद्दल प्रसाद आबनावे यांचा, बाबू जगजीवनराम कला साहित्य व संस्कृती अकादमी, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल प्रथमेश आबनावे यांचा, तर भारतीय मजदूर संघाच्या कार्यकारिणीत निवड झाल्याबद्दल पुष्कर आबनावें यांचाही सत्कार करण्यात आला.

प्रसाद आबनावे म्हणाले, ''प्रेमाने, आपुलकीने माणसांना जिंकता येते. त्यातून कामे सहज व सोपे होतात. परस्पर सहकार्य आणि सामंजस्याची भावना जपावी, अशी शिकवण डॉ. विकास यांनी आपल्याला दिली आहे. 'विकासपर्व' कार्यक्रमात सर्वानी भाग घ्या." 

प्रथमेश आबनावे यांनी 'विकासपर्व'ची संकल्पना समजावून सांगितली. संस्था शंभराव्या वर्षात पदार्पण करत असल्याने अनेक नवीन गोष्टींची सुरवात होत आहे. वाणिज्य, विधी महाविद्यालय, हॉस्टेल उभारण्यात येणार असल्याचे त्यांनी नमूद केले. अरुण खोरे यांनी मार्गदर्शन केले. सुशांत देशपांडे यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. रुपाली राऊत यांनी आभार मानले.

बीड 

प्रतिनिधी - विश्वनाथ शरणांगत

_________