डॉ. मदन हर्डीकर, इंजि. अनिल पाटील यांना 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रज्ञावंत पुरस्कार'...

राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद आणि बंधुता प्रतिष्ठान, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रज्ञावंत पुरस्कार' यंदा प्रसिद्ध अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. मदन हर्डीकर आणि पाणीतज्ज्ञ इंजि. अनिल पाटील यांना जाहीर झाला आहे.

डॉ. मदन हर्डीकर, इंजि. अनिल पाटील यांना 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रज्ञावंत पुरस्कार'...
Dr. Madan Hardikar, Engg. Anil Patil to 'Dr. Babasaheb Ambedkar Pragyawant Award '...
डॉ. मदन हर्डीकर, इंजि. अनिल पाटील यांना 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रज्ञावंत पुरस्कार'...

डॉ. मदन हर्डीकर, इंजि. अनिल पाटील यांना 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रज्ञावंत पुरस्कार'...

पिंपरी (पुणे) : राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद आणि बंधुता प्रतिष्ठान, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रज्ञावंत पुरस्कार' यंदा प्रसिद्ध अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. मदन हर्डीकर आणि पाणीतज्ज्ञ इंजि. अनिल पाटील यांना जाहीर झाला आहे. सन्मानचिन्ह, मानपत्र आणि रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरूप आहे. चिखली येथे ६ डिसेंबर २०२० रोजी आयोजित सातव्या विद्यार्थी-शिक्षक साहित्य संमेलनात संतसाहित्याचे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत.

प्राचार्य प्रदीप कदम यांच्या अध्यक्षतेखाली पिंपरी चिंचवड शहरातील चिखली येथील महाराष्ट्र विद्यार्थी केंद्र संचलित कॉंनक्वेस्ट महाविद्यालयात हे संमेलन होणार आहे. आतापर्यंत डॉ. निर्मलकुमार फडकुले, डॉ. प्र. चि. शेजवलकर, सय्यदभाई, डॉ. रामचंद्र देखणे आदी मान्यवरांना 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रज्ञावंत पुरस्कार' प्रदान करण्यात आलेला आहे, अशी माहिती राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश रोकडे यांनी दिली.

बीड 

प्रतिनिधी - विश्वनाथ शरणांगत

_________