डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानने दिले डोंबिवली पोलीस ठाण्याला बॅरिकेटस...

डोंबिवली शाहतील वाहतूक कोंडी नियंत्रणात आणण्यासाठी डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानने डोंबिवली पोलीस ठाण्याला बॅरिकेटस दिले आहेत.

डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानने दिले डोंबिवली पोलीस ठाण्याला बॅरिकेटस...
Dr. Shri Nanasaheb Dharmadhikari Pratishthan gave barricades to Dombivali Police Station ...
डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानने दिले डोंबिवली पोलीस ठाण्याला बॅरिकेटस...
डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानने दिले डोंबिवली पोलीस ठाण्याला बॅरिकेटस...

डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानने दिले डोंबिवली पोलीस ठाण्याला बॅरिकेटस...

कल्याण : डोंबिवली शाहतील वाहतूक कोंडी नियंत्रणात आणण्यासाठी डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानने डोंबिवली पोलीस ठाण्याला बॅरिकेटस दिले आहेत. डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या या मदतीबाबत पोलिसांनी त्यांचे आभार मानले. यावेळी मानपाडा पोलीस ठाण्याचे वपोनि डी.एच.चौरे, टिळक नगर पोलीस ठाण्याचे वपोनि अभय धुरी, विष्णुनगर पोलीस ठाण्याचे वपोनि वपोनि एस.एस.साबळे, शहर वाहतूक शाखा डोंबिवली विभाग सहाय्यक पोलीस निरीक्षक राजश्री शिंदे, सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक आर.बी.पाटील व त्यांचे सहकारी उपस्थित होते.

पद्मश्री डॉ.श्री दत्तात्रेय नारायण तथा आप्पासाहेब धर्माधिकारी व रायगड भूषण सचिन धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे हे ६० बॅरिकेटस सहाय्यक पोलीस आयुक्त जे.डी.मोरे यांच्या उपस्थितीत पोलीस विभागाकडे सुपूर्त करण्यात आले.

महाराष्ट्र भूषण तीर्थरूप डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांनी सुरू केलेल्या बैठकीच्या माध्यमातून वाईट वळणाकडे गेलेल्या अनेक व्यक्तींना सदमार्गाकडे वळवण्याचे कार्य केले जाते. रायगड, रत्नागिरी, ठाणे जिल्ह्यामध्ये आपण सर्व हे पाहिल्याचे सांगितले. प्रतिष्ठानने उपलब्ध करून दिलेले ६० बॅरिकेट्स आम्हाला ट्राफिक नियंत्रण, व्हीआयपी बंदोबस्त, मोर्चे, आंदोलने, नाकाबंदी इत्यादी कामासाठी अतिशय उपयुक्त ठरतील असे यावेळी जयराम मोरे यांनी सांगितले.

कल्याण, ठाणे

प्रतिनिधी - कुणाल म्हात्रे 

___________