मुंबईत 29 वर्षीय डॉक्टर तरुणीची आत्महत्या

बंगालीला कुटुंबियांनी नायर रुग्णालयात नेले, मात्र दाखल करण्यापूर्वीच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले

मुंबईत 29 वर्षीय डॉक्टर तरुणीची आत्महत्या
doctor commits suicide

मुंबईत 29 वर्षीय डॉक्टर तरुणीची आत्महत्या

बंगालीला कुटुंबियांनी नायर रुग्णालयात नेले, मात्र दाखल करण्यापूर्वीच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

29 वर्षीय डॉक्टर तरुणीने आत्महत्या केल्याची घटना मुंबईत उघडकीस आली आहे. इंजेक्शन घेऊन डॉ. निताशा बंगाली हिने आपलं आयुष्य संपवलं. मुंबईतील वरळी भागात दोन दिवसांपूर्वी ही घटना घडली. (29-year-old doctor commits suicide in Mumbai)


डॉ. निताशा बंगाली आपल्या आई-वडिलांसह मुंबईतील वरळी भागात राहत होती. मेडिकलचे उच्चशिक्षण घेत असलेली निताशा गेल्या काही महिन्यांपासून डिप्रेशनशी झुंजत होती. गुरुवारी तिने राहत्या घरी स्वतःला इंजेक्शन टोचून घेतले. त्यानंतर तिची तब्येत खालावत गेली. 

निताशा बंगालीला कुटुंबियांनी नायर रुग्णालयात नेले, मात्र दाखल करण्यापूर्वीच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. पोलिसांच्या माहितीनुसार निताशाची आईही डॉक्टर आहे, तर तिचे वडील इंजिनिअर आहेत. निताशा एमबीबीएस डॉक्टर होती, तर एमडीचे शिक्षण घेत होता. आतापर्यंत तिच्याकडे कुठलीही सुसाईड नोट सापडलेली नाही.

अभ्यासाबाबत निताशा तणावाखाली होती. तिच्या डिप्रेशनवर उपचारही सुरु होते, अशी माहिती आहे. पोस्टमार्टम अहवालानंतरच तिच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले.जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात दोन दिवसांपूर्वी अशीच धक्कादायक घटना घडली होती. 24 वर्षीय नवविवाहित महिला डॉक्टर प्रांजल कोल्हे हिने आत्महत्या केली. डॉ. प्रांजल कोल्हे हिचा अवघ्या पाच महिन्यांपूर्वीच विवाह झाला होता. ‘पप्पा मला माफ करा’ अशी चिठ्ठी आत्महत्या करण्यापूर्वी डॉक्टर प्रांजल कोल्हे हिने वडिलांच्या नावे लिहिली होती.(29-year-old doctor commits suicide in Mumbai)

माझ्या मृत्यूसाठी कोणालाही जबाबदार धरु नये, असेही डॉक्टर प्रांजलने सुसाईड नोटमध्ये लिहिले होते