समाजसेवक विलास रंदवे यांची चिमुकल्यांसोबत दिवाळी...
अटाळी आंबिवली परिसरातील भाजपा पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते विलास रदंवे यांनी सामाजिक बांधलीकीच्या जाणीवेतून दिवाळी निमित्ताने स्लम परिसरातील बालवाडी मधील चिमकुल्यांसाठी दिवाळी फराळ, खाऊचे आणि फटाक्यांचे वाटप करीत सोशल डिस्टन नियमांचे पालन करीत दिवाळी साजरी केली.
समाजसेवक विलास रंदवे यांची चिमुकल्यांसोबत दिवाळी...
कल्याण : अटाळी आंबिवली परिसरातील भाजपा पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते विलास रदंवे यांनी सामाजिक बांधलीकीच्या जाणीवेतून दिवाळी निमित्ताने स्लम परिसरातील बालवाडी मधील चिमकुल्यांसाठी दिवाळी फराळ, खाऊचे आणि फटाक्यांचे वाटप करीत सोशल डिस्टन नियमांचे पालन करीत दिवाळी साजरी केली.
सामाजिक कार्याचा वसा घेतलेल्या विलास रदंवे यांनी कोरोना पार्श्वभूमीवर तळागाळातील लोकांना अन्न धान्य किट, आरोग्य सेवेबाबत मदतीचा हात दिला आहे. लाँकडाऊनमुळे आर्थिक गर्तेत असलेल्या पालकांना दिलासा मिळण्यासाठी व बालकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्यासाठी दिवाळी निमित्ताने अटाळी, आंबिवली परिसरातील बालवाडी मधील चिमुकल्यासाठी दिवाळी फराळ, खाऊचे फटाक्यांचे वाटप केले. तसेच सांस्कृतिक कार्यक्रम सोशल डिस्टन नियमाचे पालन करीत लहान मुलांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी सादरीकरण करीत दिवाळी साजरी केली.
कल्याण, ठाणे
प्रतिनिधी - कुणाल म्हात्रे
___________