आदिवासी विकास मंत्री यांना आदिवासीं समजाकडून दिवाळी खावटी भेट तहसील कार्यालयाच्या आवारात आंदोलन...

दिपावली चा सण गेला मात्र अजून आदिवासी समाजाला खावटी अनुदानाचे वाटप झाले नाही या निषेधार्थ वाडा तहसील कार्यालय जवळ श्रमजीवी संघटने कडून आदिवासी विकास मंत्री के.सी. पाडवी यांना आदिवासी समजाकडून तहसील कार्यालयाच्या माध्यमातून चवळी, कडूकांद, करांदे,चटणी या सारखी आदिवासींच्या रोजच्या अन्नातील घटक म्हणून दिवाळी खावटी भेट देण्यात आली.

     राज्य सरकारने खावटी योजना लागू करावी यासाठी श्रमजीवी संघटने पालघर जिल्ह्यासह इतर जिल्ह्यात आंदोलने केली होती.या नंतर राज्य सरकारने ९ सप्टेंबर २०२० रोजी निर्णय घेऊन खावटी अनुदान योजना जाहीर केली.मात्र ती खावटी अद्याप  मिळाली नाही. सरकार आदिवासी समाजाच्या भुके कडे दुर्लक्ष करीत असल्याचे आरोप श्रमजीवी कडून यावेळी करण्यात आला.

वाडा

प्रतिनिधी - जयेश घोडविंदे

___________