रोटरी क्लबतर्फे अंगणवाडी मुलांना दिवाळीची फराळ भेट...

सध्या राज्यावर कोरोनाचे सावट असून हिंदूंचा सर्वात मोठा सण दिवाळी हा जवळ आला आहे. दिवाळी सण सर्वत्र आनंदात साजरा होत असताना गरीब कुटुंब मात्र या आनंदापासून वंचित राहतात. आर्थिक परिस्थितीमुळे रोजचे जेवण सुद्धा मिळत नाही.

रोटरी क्लबतर्फे अंगणवाडी मुलांना दिवाळीची फराळ भेट...
Rotary Club presents Diwali gifts to Anganwadi children ...
रोटरी क्लबतर्फे अंगणवाडी मुलांना दिवाळीची फराळ भेट...

रोटरी क्लबतर्फे अंगणवाडी मुलांना दिवाळीची फराळ भेट...

सध्या राज्यावर कोरोनाचे सावट असून हिंदूंचा सर्वात मोठा सण दिवाळी हा जवळ आला आहे. दिवाळी सण सर्वत्र आनंदात साजरा होत असताना गरीब कुटुंब मात्र या आनंदापासून वंचित राहतात. आर्थिक परिस्थितीमुळे रोजचे जेवण सुद्धा मिळत नाही. अशा कुटुंबांच्या घरात दिवाळीला फराळ कसा बनवणार अशी परिस्थिती असताना त्यांना दिवाळीच्या फराळाचा आनंद घेता यावा. आणि त्यांची ही दिवाळी गोड व्हावी.

यासाठी रोटरी क्लब पालघर नेहमीच प्रयत्न करत असते. रोटरी क्लब तर्फे आज गुन्दावले, साया, पडवळ पाडा, मस्तान नाका आणि टाकवहाळ येथील अंगणवाडीतील एकूण २५० मुलांना दिवाळीनिमित्त फ़राळ वाटप करण्यात आले. त्यामुळे २५० कुटुंबांची दिवाळी आनंदमय बनली आहे. यावेळी रोटरी क्लब पालघरचे अध्यक्ष निनल शहा, सचिव जयेश आव्हाड, खजिनदार स्वाती पाटील, प्रकल्पप्रमुख विनिता पाटील, डिस्ट्रिक्ट प्रोजेक्ट डायरेक्टर भगवान पाटील, डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी रफिक लूलानिया, क्लब डायरेक्टर हेमंत वारैया,  रोटरी क्लब ऑफ मनोरचे अध्यक्ष विलास पाटील, उपेन वर्मा आणि सदस्य उपस्थित होते.

पालघर

प्रतिनिधी - राजेंद्र पाटील

___________