शिरसगाव बोडखा गावामध्ये ग्रामपंचायतीच्या वतीने आर्सेनिक अल्बम ३० गोळ्याचे वाटप...
१४व्या वित्त आयोग अंतर्गत व्याजाची रक्कम जिल्हा परिषद अहमदनगर यांचेकडे वर्ग करण्यात आली होती.
शिरसगाव बोडखा गावामध्ये ग्रामपंचायतीच्या वतीने आर्सेनिक अल्बम ३० गोळ्याचे वाटप...
शिरसगाव बोडखा : १४व्या वित्त आयोग अंतर्गत व्याजाची रक्कम जिल्हा परिषद अहमदनगर यांचेकडे वर्ग करण्यात आली होती.
त्यामधुनच आर्सेनिक अल्बम ३० गोळ्यां खरेदी करण्यात आल्या प्रति मानसी एक याप्रमाणे वाटप करण्यात आले आहे. या करिता शिरसगाव बोडखा गावासाठी १७०५ गोळ्यां प्राप्त झाल्या असून त्याचे प्रति कुटुंबाला वाटप करण्यात आल्या आहेत.
कोविड-19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आज ग्रामपंचायत कार्य शिरसगाव बोडखा कार्यालय मध्ये नागरिकांना आर्सेनिक अल्बम ३० गोळ्याचे वाटप करण्यात आले. आर्सेनिक अल्बम ३० गोळ्या हया स्वच्छ व चांगल्याप्रकारे असल्याचे आढळून आले आहे .
ग्रामसेवक अधिकारी श्री नवनाथ गायकवाड यांनी नागरिकांना आर्सेनिक अल्बम ३० गोळ्यां चे वाटप करत असताना काही सुचना सुध्दा दिल्या आहे. कि आर्सेनिक अल्बम ३० गोळ्यां लहान मुलांनी २ ते ३ आणि नागरिकांनी ४ ते ६ अशा प्रकारे गोळ्याचे सेवन करावे तसेच या गोळ्याचे तीन दिवस सेवन केल्यानंतर 30 दिवसांनंतर सेवन करावे असे सांगितले .अशी माहिती ग्रामसेवक अधिकारी श्री नवनाथ गायकवाड यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे.
शिरसगाव बोडखा
प्रतिनिधी - आदेश उबाळे
___________