आर एस पी अधिकारी शिक्षक युनिट तर्फे आदिवासी पाड्यात गरजूंना धान्य वाटप |  Adivasi Pada | Kalyan

कल्याण (Kalyan) :  स्वातंत्र्य दिनानिमित्त आर एस पी अधिकारी शिक्षक कल्याण डोंबिवली युनिटच्या सहकार्याने, सी एन पाटील फाऊंडेशन, व कल्याण सामाजिक संस्था यांच्यावतीने आंबिवली,  गाळेगाव येथील आदिवासी पाड्यात ५० कुटुंबांना अन्नधान्य वाटप करण्यात आले. कोरोना आपत्तीत सर्वसाधारण लोकांना रोजगार नाही.

आर एस पी अधिकारी शिक्षक युनिट तर्फे आदिवासी पाड्यात गरजूंना धान्य वाटप |  Adivasi Pada | Kalyan
RSP Officer teachers Unit Kalyan
आर एस पी अधिकारी शिक्षक युनिट तर्फे आदिवासी पाड्यात गरजूंना धान्य वाटप |  Adivasi Pada | Kalyan
आर एस पी अधिकारी शिक्षक युनिट तर्फे आदिवासी पाड्यात गरजूंना धान्य वाटप |  Adivasi Pada | Kalyan

आर एस पी अधिकारी शिक्षक युनिट तर्फे आदिवासी पाड्यात गरजूंना धान्य वाटप |  Adivasi Pada | Kalyan

कल्याण (Kalyan) :  स्वातंत्र्य दिनानिमित्त आर एस पी अधिकारी शिक्षक कल्याण डोंबिवली युनिटच्या सहकार्याने, सी एन पाटील फाऊंडेशन, व कल्याण सामाजिक संस्था यांच्यावतीने आंबिवली,  गाळेगाव येथील आदिवासी पाड्यात ५० कुटुंबांना अन्नधान्य वाटप करण्यात आले. कोरोना आपत्तीत सर्वसाधारण लोकांना रोजगार नाही. त्यामुळे  उपासमारीला सामोरे जावे लागत आहे. अश्या परिस्थितीत गेल्या पाच महिन्यांपासून आर एस पी अधिकारी शिक्षक युनिट तर्फे, एक सामाजिक बांधिलकी जपत, ४ हजार कुटुंबांना अन्नधान्य वितरण करण्यात आले आहे. तसेच रोज २५०/३००लोकांना ( कामगार )दुपारचे जेवण देण्याचे कार्य सुरू आहे.

या सामाजिक कार्यात आर एस पी अधिकारी शिक्षक कल्याण डोंबिवली युनिटचे कमांडर मनिलाल शिंपी यांचा नेतृत्वाखाली आर एस पी अधिकारी शिक्षक महादेव क्षीरसागर, अनिल बोरनारे, शिंपी,बन्सीलाल महाजन,अनंत किनगे, दिलीप पावरा, जितेंद्र सोनवणे,तुषार बोरसे,केशव मालुंजकर, रामदास भोकनल,सचिन मालपुरे,कैलास पाटील,दत्तात्रय पाटील,नितिन पाटील,रितेश पाटील, भानुदास शिंदे, भारती जाधव, सर्व आर एस पी अधिकारी शिक्षक युनिट ची टीम २२मार्च पासून प्रशासनाला आणि पोलिस विभागाला खांद्याला खांदा लावून नाकाबंदी, समाजसेवा असे कर्तव्य करत आहेत.

कल्याण, ठाणे  

प्रतिनिधी - कुणाल म्हात्रे 

_______

Also see : सफाळयात  गोपाळकाला उत्सवानिमित्त कोरोना योद्ध्यांचा  सत्कार | Corona warriors | Gopalkala | Safale

https://www.theganimikava.com/corona-warriors-felicitated-on-the-occasion-of--gopalka-safala-palghar