धनंजय मुंडे सात तास जनतेच्या दरबारात रमतात तेव्हा जिल्हाच्या ठिकाणी म्हणजे बीड ला मंळवारी पालकमंञ्याची आनेक विषयावर बैठक...

बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी एक दोन तास नव्हे तर तब्बल सात तास परळीत जनता दरबार घेतला. त्यांचा सात तास चाललेला जनता दरबार आलेल्या प्रत्येक व्यक्तीला भेटून त्यांची अडचण/प्रश्न/समस्या समजून घेत ती जिथल्या तिथे सोडवण्याचा प्रयत्न करणे हे त्यांचे वैशिष्ट्य अधोरेखित करणारा ठरला.

धनंजय मुंडे सात तास जनतेच्या दरबारात रमतात तेव्हा जिल्हाच्या ठिकाणी म्हणजे बीड ला मंळवारी पालकमंञ्याची आनेक विषयावर बैठक...
When Dhananjay Munde plays in the court of the people for seven hours, the place of the district, Beed, on Tuesday, the meeting of the Guardian on many issues ...
धनंजय मुंडे सात तास जनतेच्या दरबारात रमतात तेव्हा जिल्हाच्या ठिकाणी म्हणजे बीड ला मंळवारी पालकमंञ्याची आनेक विषयावर बैठक...
धनंजय मुंडे सात तास जनतेच्या दरबारात रमतात तेव्हा जिल्हाच्या ठिकाणी म्हणजे बीड ला मंळवारी पालकमंञ्याची आनेक विषयावर बैठक...

धनंजय मुंडे सात तास जनतेच्या दरबारात रमतात तेव्हा जिल्हाच्या ठिकाणी म्हणजे बीड ला मंळवारी पालकमंञ्याची आनेक विषयावर बैठक...

परळी (दि. २१) : बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी एक दोन तास नव्हे तर तब्बल सात तास परळीत जनता दरबार घेतला. त्यांचा सात तास चाललेला जनता दरबार आलेल्या प्रत्येक व्यक्तीला भेटून त्यांची अडचण/प्रश्न/समस्या समजून घेत ती जिथल्या तिथे सोडवण्याचा प्रयत्न करणे हे त्यांचे वैशिष्ट्य अधोरेखित करणारा ठरला.

विधान परिषद निवडणूक आचार संहिता संपल्यानंतर परळीत ना. मुंडे यांचा हा पहिलाच जनता दरबार असावा; तसे तर माणसं भेटतील तिथेच जनता दरबार आणि तिथून काम मार्गी लावणे हे त्यांच्या जनता दरबाराचे दुसरे वैशिष्ट्य म्हणता येईल.

परळी येथील जगमित्र कार्यालयात आज धनंजय मुंडे हजारो लोकांना प्रत्यक्ष भेटून त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यात रमले होते. वैयक्तिक कामे, वैयक्तिक अडचणी, सार्वजनिक कामे, विविध मागण्या यासह अगदी कौटुंबिक व गाव गाड्याच्या समस्या घेऊन देखील अनेक लोक ना. मुंडेंना भेटतात. आलेल्या प्रत्येकाचे समाधान करणे एवढ्या मोठ्या गर्दीत बऱ्याचदा शक्य होत नाही, परंतु आलेल्या प्रत्येकाचे म्हणणे ऐकून घेऊन त्यावर निश्चित कार्यवाही करणे व त्याचे समाधान करूनच परत पाठवणे हे ना. मुंडेंच्या नेहमी चालणाऱ्या जनता दरबाराचे तिसरे व महत्वपूर्ण वैशिष्ट्य म्हणता येईल. 

बीड येथे जिल्ह्याच्या विविध विषयी मंगळवारी महत्वपूर्ण बैठका

दरम्यान ना. धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील कापूस खरेदी, रब्बी हंगामातील विविध कृषी विषय, राष्ट्रीय महामार्गाचे काम यासह जिल्ह्यातील अन्य महत्वपूर्ण विषयांबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व विभागाचे प्रमुख अधिकारी व लोकप्रतिनिधी यांच्या उपस्थितीत महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे.

बीड

प्रतिनिधी - विश्वनाथ शरणांगत 

___________