मुरबाडमध्ये कस्तुरीच्या वास्तुशांतीला देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट...
मुरबाड विधानसभेचे कार्यसम्राट आमदार किसन कथोरे यांच्या मुरबाडमधील नवीन वास्तुशांतीच्या तीन दिवसीय महापूजेचे आयोजन केले होते.
मुरबाडमध्ये कस्तुरीच्या वास्तुशांतीला देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट...
मुरबाड विधानसभेचे कार्यसम्राट आमदार किसन कथोरे यांच्या मुरबाडमधील नवीन वास्तुशांतीच्या तीन दिवसीय महापूजेचे आयोजन केले होते. या महापूजेच्या महातीर्थप्रसादाचा लाभ महाराष्ट्रातील जवळजवळ सर्वच पक्षातील बड्या नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी, शासकीय व प्रशासकीय अधिकारी ,सामाजिक कार्यकर्ते यांनी आमदार कथोरे यांची सदिच्छा भेट घेऊन महातीर्थ प्रसादाचा लाभ घेतलाा.
यावेळी दहा तारखेच्या पूर्वसंध्येला 8:30च्या दरम्यान महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आमदार कथोरे यांच्या कस्तुरी या नवीन वास्तुशांतीला भेट देऊन आमदार कथोरे यांचा महाराष्ट्रात दांडगा परिचय व राजकारणापेक्षा समाजकारणाचा सखोल परिपूर्ण अनुभव असल्याचे या वास्तुशांती दरम्यान दिसून आले यावेळी आमदार किसन कथोरे यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे व तमाम जनतेचे आभार मानले आहेत.
यावेळी भिवंडी लोकसभेचे खासदार कपिल पाटील, माजी मंत्री जगन्नाथ पाटील ,राजेश पाटील, कुमार आयलानी, जयवंत सूर्यराव, अण्णा साळवे , भाजप शहर अध्यक्ष भाई तेलवणे यांच्यासह विविध मान्यवरांनी या तीर्थ प्रसादाचा लाभ घेतला.
यावेळी सुपरस्टार ऑल सोशल मीडिया वेल्फेअर फाउंडेशन महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटनेकडून आमदार किसन कथोरे यांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाची प्रतिमा भेट देऊन नवीन गृहप्रवेशाच्या शुभेच्छा दिल्याा.
संपूर्ण बातमीचा आढावा आमचे मुरबाडचे प्रतिनिधी लक्ष्मण पवार यांनी घेतला आहे.
मुरबाड
प्रतिनिधी - लक्ष्मण पवार
___________