राज्य माहिती आयोग खंडपीठ औरंगाबाद यांच्या आदेशाला केराची टोपली गट विकास अधिकारी मिसाळ पं.स. बीड यांचा कारनामा...| मुख्य कार्यकारी आधिकारी यांनां दिले निवेदन ...| संबधीत आधिकाऱ्यावर कार्यवाही करा नसता लोकशाही मार्गाने आंदोलन झेडणार ...| लखन जोगदंड शहर आध्यक्ष बीड यांचा विशारा ...
बीड कार्यकारी आधिकारी बीड यांना निवेदन देवुन केली विनंती संबंधीत आधिकाऱ्यावर योग्य कार्यवाही करा नसता लोकशाही मार्गाने अंदोलन करू या बाबतचे निवेदन बीड शहर अध्यक्ष लखन जोगदंड यांनी दिले.
राज्य माहिती आयोग खंडपीठ औरंगाबाद यांच्या आदेशाला केराची टोपली गट विकास अधिकारी मिसाळ पं.स. बीड यांचा कारनामा...
मुख्य कार्यकारी आधिकारी यांनां दिले निवेदन ..
संबधीत आधिकाऱ्यावर कार्यवाही करा नसता लोकशाही मार्गाने आंदोलन झेडणार ...
लखन जोगदंड शहर आध्यक्ष बीड यांचा इशारा...
बीड कार्यकारी आधिकारी बीड यांना निवेदन देवुन केली विनंती संबंधीत आधिकाऱ्यावर योग्य कार्यवाही करा नसता लोकशाही मार्गाने अंदोलन करू या बाबतचे निवेदन बीड शहर अध्यक्ष लखन जोगदंड यांनी दिले.
सविस्तर वृतांत - माहिती अधिकार अधिनियम 2005 अन्वये पंचायत समिती येथील वृक्ष संगोपना संदर्भातील माहिती जन माहिती अधिकारी यांच्याकडे प्रथम अर्ज देऊन मागणी केली होती परंतु माहिती न देण्याच्या उद्देशाने वारंवार टाळाटाळ करून वेळ वाया घालत होते प्रथम अपील दाखल केल्यानंतर प्रथम अपीलीय अधिकारी पंचायत समिती बीड यांनी सात दिवसाच्या आत विनामूल्य व परिपूर्ण माहिती देण्यात यावी असा निर्णय पारित केला होता परंतु जन माहिती अधिकारी यांनी ती माहिती देण्यास कसल्याही प्रकारे प्रयत्न केले नाहीत सदर प्रकरण राज्य माहिती आयोग खंडपीठ औरंगाबाद येथे ते दाखल केले असता अपील क्रमांक 4057/2019 असा होता त्यामध्ये आदेश क्रमांक 1674 दिनांक 22/01/2020 रोजी सदर अपील मंजूर करण्यात आले. तसेच वर्तमान जन माहिती अधिकारी यांनी अपीलार्थी यांना आवश्यक असलेली मूळ कार्यालयात उपलब्ध असलेली माहिती आदेश प्राप्त होतात 15 दिवसाच्या आत नोंदणीकृत टपालाद्वारे कलम 7(6) नुसार विनामूल्य उपलब्ध करून द्यावी संबंधित जन माहिती अधिकारी यांनी अधिनियमातील कलम 7(1) चा भंग केलेला आहे. त्यामुळे त्यांचे विरुद्ध अधिनियमातील कलम 20 मधील तरतुदीनुसार कारवाई का करण्यात येऊ नये याचा खुलासा त्यांनी आयोगाचे आदेश प्राप्त होताच 30 दिवसाच्या आत प्रत्यक्ष उपस्थित राहून करावा अन्यथा सदर कालावधीत आपला खुलासा आयोगास प्राप्त न झाल्यास हा योग्य निर्णय घेण्यात येईल. गटविकास अधिकारी पंचायत समिती बीड यांनी अधिनियमातील कलम 7(1) किंवा अन्य कलमाच्या भंगार जबाबदार व्यक्तीचे नावे निश्चित करून त्यांना आदेश बजवावा व त्याची पोहोच जतन करावी असा आदेश असताना गट विकास अधिकारी श्री मिसाळ साहेब पंचायत समिती बीड यांची वारंवार भेट देऊन माहिती उपलब्ध करून द्यावी व कलमाचा भंगास जबाबदार व्यक्तीचे नावे निश्चित करावीत अशी वारंवार विनंती केली तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड यांना 27/05/2020 रोजी निवेदन वजा तक्रार देऊन राज्य माहिती आयोग खंडपीठ औरंगाबाद यांच्या आदेशाची अंमलबजावणी करणे बाबत विनंती केली परंतु श्री मिसाळ साहेब गटविकास अधिकारी पं. स. बीड यांनी राज्य माहिती आयोग खंडपीठ औरंगाबाद यांचा आदेश व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या पत्राला कसलेही महत्व न देता मनमानी कारभार करत आहेत.
माहिती उपलब्ध न करून दिल्यामुळे व आदेशाची अंमलबजावणी न केल्यामुळे श्री मिसाळ साहेब गटविकास अधिकारी पं.स. बीड यांच्यावर नियमानुसार कायदेशीर कारवाई करावी व माहिती उपलब्ध करून द्यावी अशी विनंती वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष लखन जोगदंड यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड यांना निवेदनाद्वारे केली आहे.
बीड
प्रतिनिधी - विश्वनाथ शरणांगत
___________