शेतकरी विरोधी कृषी कायद्याच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीचे सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन चालु आहे...| शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर वंचित बहुजन आघाडी आक्रमक पवित्रा...

वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आद.ऍड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी दिल्लीत होत असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी तसेच विविध मागण्यांसाठी राज्यस्तरीय धरणे आंदोलनाची हाक दिली होती.

शेतकरी विरोधी कृषी कायद्याच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीचे सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन चालु आहे...

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर वंचित बहुजन आघाडी आक्रमक पवित्रा...

वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आद.ऍड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी दिल्लीत होत असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी तसेच विविध मागण्यांसाठी राज्यस्तरीय धरणे आंदोलनाची हाक दिली होती.दिल्लीत होत असलेल्या आमच्या शेतकरी बांधाच्या आंदोलनाने भारतीय रेल्वेच्या खाजगीकरणला व सर्व सार्वजनिक सेवांच्या खाजगीकरणला विरोध करण्याची भूमिका घ्यावी.

महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्रातील शेतकरी विरोधी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कायद्यात दुरुस्ती करणारा अध्यादेश ताबडतोब काढावा व विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात शेतकऱ्यांच्या शेतमालाला किमान आधारभूत किंमत हमी भाव मिळविण्यासाठी कायद्यात तरतूद करावी व त्याची कठोर अंमलबजावणी करावी ,रेल्वेच्या खाजगिकरणामुळे शेतमालाची वाहतूक प्रचंड खर्चिक होणार आहे व सर्वसामान्य ग्राहकांवर वाढीव भावाचे ओझे लादले जाईल यामुळे रेल्वेचे खाजगिकरणाचा निर्णय केंद्र सरकारने रद्द करावा.

आदी मागणी घेऊन वंचित बहुजन आघाडी सांगली जिल्ह्याच्या वतीने सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.यावेळी डॉ. विवेक गुरव,डॉ. क्रांती सावंत,उमरफारूक (भाई) ककमरी,महावीर (तात्या) कांबळे, प्रा. सोमनाथ साळुंखे सर, मुझ्झफर काझी, चंद्रकांत (दादा) खरात, साहेबराव लोखंडे,लक्ष्मीताई बनसोडे, संजय कांबळे,ऍड. अमित कांबळे,अपर्णाताई वाघमारे, राजेश गायगवाळे,साहेबराव चंदनशिवे, प्रशांत कदम, हिरामण भगत, धीरज कांबळे, राजू कांबळे, डॉ. राजेंद्र साठे,मनिषाताई म्हस्के, सागर आठवले, संभाजी कांबळे, अशोक आठवले, विक्रम कांबळे,ज्योतीताई पवार, बाबासाहेब वाघमारे, शुभम वाघमारे, आनंद कांबळे, रविंद्र विभूते, राखीताई खरात, चंद्रकांत देवकुळे, गौतम शिंगे, किरण कांबळे, रोहित शिवशरण,शरद वाघमारे, सिद्धार्थ लोंढे, ऋषिकेश माळी आदी उपस्थित होते.

सांगली जिल्हा

प्रतिनिधि - जगन्नाथ सकट

___________