पदवीधरांच्या न्यायहक्कासाठी प्राध्यापक नागोराव पांचाळ यांना बहुमताने विजयी करा - संतोष जोगदंड बीड

मराठवाडा पदवीधर संघाचे वंचित बहुजन आघाडी चे पुरस्कृत उमेदवार प्राध्यापक नागोराव पांचाळ यांना पदवीधरांच्या न्याय हक्कासाठी पदवीधर उच्चशिक्षित युवकांनी पहिली पसंती देऊन बहुमताने विजयी करण्याचे आव्हान वंचित बहुजन आघाडीचे बीड युवक जिल्हाध्यक्ष संतोष जोगदंड यांनी केले आहे.

पदवीधरांच्या न्यायहक्कासाठी प्राध्यापक नागोराव पांचाळ यांना बहुमताने विजयी करा - संतोष जोगदंड बीड
Defeat Professor Nagarao Panchal by a majority for the rights of graduates - Santosh Jogdand Beed

पदवीधरांच्या न्यायहक्कासाठी प्राध्यापक नागोराव पांचाळ यांना बहुमताने विजयी करा - संतोष जोगदंड बीड 

मराठवाडा पदवीधर संघाचे वंचित बहुजन आघाडी चे पुरस्कृत उमेदवार प्राध्यापक नागोराव पांचाळ यांना पदवीधरांच्या न्याय हक्कासाठी पदवीधर उच्चशिक्षित युवकांनी पहिली पसंती देऊन बहुमताने विजयी करण्याचे आव्हान वंचित बहुजन आघाडीचे बीड युवक जिल्हाध्यक्ष संतोष जोगदंड यांनी केले आहे. उठ बहुजना जागा हो पदवीधर युवकांच्या न्याय हक्कासाठी चा धागा हो गतवर्षी च्या पदवीधर आमदारांनी पदवीधर तरुणांचा वापर करून घेतला असून त्यांच्या न्याय हक्कासाठी आज तागायत कसली ही भूमिका बजावली नाही.

शिक्षण क्षेत्रातील अनेक उच्च विद्या विभूषित प्राध्यापक डॉक्टर इंजिनीयर वकील पत्रकार तसेच पदवीधर युवक यांना बेरोजगार करण्याचे काम माजी पदवीधर आमदारांनी केला असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे बीड युवक जिल्हा अध्यक्ष संतोष जोगदंड यांनी केला आहे.होऊ घातलेल्या औरंगाबाद पदवीधर मतदार संघामध्ये वंचित बहुजन आघाडीचे पुरस्कृत उमेदवार प्राध्यापक नागोराव पांचाळ हे सर्वसामान्य पदवीधरांचे प्रश्न मांडण्यासाठी व पदवीधरांचा आवाज बुलंद करण्यासाठी व त्यांना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात दंड ठोकून उभा राहिले आहेत.

त्यांना पदवीधर तरुणांचे पहिल्या पसंतीचे मत दिले तर त्यांना आपल्या हक्काचा माणूस आपले प्रश्न मांडण्यासाठी योग्य उमेदवार दिला असल्याचे सार्थक होईल असे ही यावेळी वंचित बहुजन आघाडी बीड युवक जिल्हाध्यक्ष संतोष जोगदंड यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात कळवले आहे.

बीड 

प्रतिनिधी - विश्वनाथ शरणांगत

___________