राहुल गांधींचा मोदींना खोचक टोला

गंगा नदीत मृतदेह तरंगताना आढळत आहे. त्यामुळे देशभर संतापाची लाट पसरली आहे.

राहुल गांधींचा मोदींना खोचक टोला
dead bodies in ganga

राहुल गांधींचा मोदींना खोचक टोला

Rahul Gandhi slams Modi

गंगा नदीत मृतदेह तरंगताना आढळत आहे. त्यामुळे देशभर संतापाची लाट पसरली आहे.

गंगा नदीत मृतदेह तरंगताना आढळत आहे. त्यामुळे देशभर संतापाची लाट पसरली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही त्यावरून केंद्रातील मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. 

राहुल गांधी यांनी ट्विट करून मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. जे म्हणायेच माँ गंगेने बोलवलं आहे. त्यांनी माँ गंगेला रडवलं आहे, अशी खोचक टीका राहुल गांधी यांनी केली आहे. राहुल गांधी यांच्या आधी काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर टीका केली आहे. गंगा मैय्याने बोलावलं आहे, असं जे म्हणायचे, आज तेच सिंहासनावर बसून जोरजोरात हसत आहेत, अशी टीका सुरजेवाला यांनी केली होती.


चोहोबाजूंनी 2000 हून अधिक मृतदेह दिसत आहेत. सर्व काही थांबलं आहे. गंगा मैय्याच्या डोळ्यातूनही अश्रू वाहत आहे. तिचाही आकांत सुरू आहे. ज्यांनी भगवे वस्त्र परिधान करून राजसत्ता मिळवली. ते सत्तेच्या नशेत मदमस्त आहेत. आणि जे म्हणायचे गंगा मैय्याने बोलावलं आहे. ते आज सिंहासनावर बसून दात विचकत आहेत, अशी टीका सुरजेवाला यांनी केली आहे.


दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून उत्तर प्रदेशात गंगा नदी किनारी अनेक मृतदेह दिसत आहेत. नदीत मृतदेह तरंगताना दिसत आहेत. त्यामुळे उत्तर प्रदेशातील राजकारण तापलं असून उत्तर प्रदेश सरकारसह केंद्रातील मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलं जात आहे.

 देशात झालेल्या एकूण मृत्यूंमध्ये महाराष्ट्राचे प्रमाण 31 टक्के, तर सक्रिय रूग्णांचे सुद्धा 14 टक्के आहे. त्यामुळे देशातील कोरोनाच्या स्थितीचा विचार करताना महाराष्ट्राची स्थिती दुर्लक्षित करता येणार नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील स्थिती सुधारली, तर केंद्र सरकारच्या संसाधनांवरील ताण कमी होईल आणि देशातील कोरोनाचा लढा अधिक ताकदीने लढता येईल, याच्याशी आपण सहमत असालच. आज महाराष्ट्राला सर्वाधिक मदत दिली जाते आहे, 

दरम्यान, देशातील काही भागात तौक्ते चक्रिवादळ येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे राहुल गांधी यांनी या पीडितांना मदत करण्याचं आवाहन केलं आहे. ज्यांना ज्या ज्या गोष्टींची गरज आहे, त्याची पूर्तता करा, असं राहुल यांनी म्हटलं आहे. केरळ, महाराष्ट्र, गोवा, तामिळनाडू, गुजरात आणि कर्नाटकात वादळ येण्याचा अॅलर्ट आहे. या वादळामुळे अनेक ठिकाणी प्रचंड पाऊस पडण्याची शक्यता आहे.

त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांनी गरजूंना मदत करावी. त्यांना सुरक्षित ठेवून त्यांची काळजी घ्या, असं राहुल यांनी म्हटलं आहे.