लोकनेते माननीय श्रीमान दौलतनाना शितोळे साहेब यांना वाढदिवसा निमित्त मनस्वी शुभेच्छा.

दौलतनाना शितोळे साहेब आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना

लोकनेते माननीय श्रीमान दौलतनाना शितोळे साहेब यांना वाढदिवसा निमित्त मनस्वी शुभेच्छा.

श्री. दौलतनाना साहेब यांचा कार्यआलेख हा नेहमी उंचावत राहिला आहे. आपल्या समाजाभिमुख कार्याने त्यांचा नावलौकिकाचा मनाचा तुरा हा समाजाला अभिमानास्पद राहिला आहे. त्यांच्या नेतृत्व खाली दि. २९ / १० /२०१७ साली देवाची जेजुरी येथे जय मल्हार क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य ह्या संघटनेची सामाजिक कार्यासाठी स्थापना झाली.

रामोशी, बेरड, बेडर सारख्या समाजावर होणाऱ्या अन्यायाला त्यांनी वाचा फोडली. त्यांच्या नेतृत्व खाली राज्यभर मोर्चे काढले, रास्ता रोखो, निवेदन देणे, अशी विविध आंदोलने लाखो समाज बांधवांच्या उपस्थितीत आजपर्यंत त्यांनी केली. त्यांच्या विधायक कार्याची यशस्वी पावती म्हणजे ७/९/२०१८ रोजी आद्यक्रांतिवीर राजे उमाजी  नाईक यांच्या २२७ व्या ऐतिहासिक जयंतीला प्रथमच राज्यांचे मुख्यमंत्री तसेच ८ कॅबिनेट मंत्री महोदय उपस्थित होते. तसेच मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस  साहेब यांनी जय मल्हार क्रांती संघटनेने मागणी केलेल्या सर्व मागण्या मान्य केल्या.

आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या जीवनपटावरील चित्रपटाला भरीव आर्थिक निधी उभारण्यात दौलतनाना साहेबांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांचे कार्य शहरी भागाबरोबर खेड्यापाड्यातील तळा गाळातल्या समाज बांधवाना एकत्रित करून न्याय-हक्कासाठी लढण्यास प्रेरणादायी ठरत आहे.

पुन्हा एकदा लोक कल्याण कार्य सम्राट, अभ्यासू व जिज्ञासू वृत्तीचे, लढवय्ये नेतृत्व श्रीमान दौलतनाना शितोळे साहेब यांना दि गनिमी कावा टीमच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

तसेच तुम्हाला शतायुष्य लाभावे हि ईश्वर चरणी प्रार्थना.

शुभेच्छुक- दिपक चव्हाण आणि मयूर कदम

___________________