जगातील सर्वांत मोठ्या धरणाला तडा जाण्याची शक्यता , चीनच्या अनेक राज्यात महापूर....

जगातील सर्वांत मोठ्या धरणाला तडा जाण्याची शक्यता , चीनच्या अनेक राज्यात महापूर येण्याची शक्यता दर्शवणात आली आहे .

जगातील सर्वांत मोठ्या धरणाला तडा जाण्याची शक्यता , चीनच्या अनेक राज्यात महापूर....

जगातील सर्वांत मोठ्या धरणाला तडा जाण्याची शक्यता , चीनच्या अनेक राज्यात महापूर....

बिजिंग : चीन मागच्या महिन्याभरापासून महापुराचं संकट झेलत आहे. मात्र चीन सरकारला भेडसावत असणारी सर्वात मोठी चिंता महापूर नव्हे, तर तो पूर निर्माण करणाऱ्या महाकाय धरणाची आहे. चीनच्या डझनभरापेक्षा जास्त राज्यांमध्ये पूर आला आहे. अनेक भागांमध्ये जमीन दिसणंसुद्धा दुरापास्त झालं आहे. जिथून कोरोना पसरला, ते वुहान शहर, त्या वुहान शहरातली लॅब आणि सी फूड मार्केट सगळं पाण्यात गेलं आहे.

या सगळ्या महापुरात मोठा वाटा आहे, तो म्हणजे थ्री जॉर्ज डॅमचा. हे जगातलं सर्वात मोठं धरण आहे.

काही दिवसांपूर्वी महापुरामुळे हे धरण फुटण्याच्या मार्गावर असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. चीननं त्या बातम्यांना खोटं ठरवत पाश्चिमात्य मीडियावर खापर फोडलं. मात्र आता चीनमधीलच काही पर्यावरणवादी या धरणाबाबत चिंता व्यक्त करु लागले आहेत. कारण, बांधकामानंतर पहिल्यांदाच या धरणातला जलसाठा सर्वाधिक पातळीवर गेला आहे.