डहाणू वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्थेच्या वतीने खासदार राजेंद्र गावित यांना दिले निवेदन...

रेल्वेने येत्या नवीन वेळापत्रकापासून जे ZBTT वेळापत्रक सुरू करण्याचे योजिले आहे, त्यात वैतरणा - डहाणू पट्ट्यातील अनेक स्थानकांवरील लांब पल्ल्यांच्या गाड्या आणि सर्वसामान्य प्रवासी, नोकरदार, विद्यार्थी वर्गाच्या दृष्टीने रोजच्या गरजेच्या मेमु, शटल, पॅसेंजर गाड्यांचे थांबे काढण्यात येणार आहेत.

डहाणू वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्थेच्या वतीने खासदार राजेंद्र गावित यांना दिले निवेदन...
Statement given to MP Rajendra Gavit on behalf of Dahanu Vaitarna Pravasi Sevabhavi Sanstha...
डहाणू वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्थेच्या वतीने खासदार राजेंद्र गावित यांना दिले निवेदन...

डहाणू वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्थेच्या वतीने खासदार राजेंद्र गावित यांना दिले निवेदन...

रेल्वेने येत्या नवीन वेळापत्रकापासून जे ZBTT वेळापत्रक सुरू करण्याचे योजिले आहे, त्यात वैतरणा - डहाणू पट्ट्यातील अनेक स्थानकांवरील लांब पल्ल्यांच्या गाड्या आणि सर्वसामान्य प्रवासी, नोकरदार, विद्यार्थी वर्गाच्या दृष्टीने रोजच्या गरजेच्या मेमु, शटल, पॅसेंजर गाड्यांचे थांबे काढण्यात येणार आहेत, तसेच अनेक पॅसेंजर आणि मेमु गाड्या मेल/एक्स्प्रेस करण्यात येणार आहेत, ज्यामुळे प्रवाशांना आर्थिक भुर्दंड तर बसणारच आहे, शिवाय अनेक स्थानकांवरील थांबे काढल्यामुळे प्रवाशांना शारीरिक आणि मानसिक त्रासही होणार आहे. 

पालघर सारख्या जिल्हा मुख्यालय असलेल्या स्थानकावरील थांबे काढल्यामुळे बाहेर गावी जाणाऱ्या प्रवाशांना एकतर मुंबई अथवा गुजरातमधील वापी स्थानक गाठावे लागणार आहे, ह्याबाबत  डहाणू वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्थेचे सहसचिव प्रथमेश प्रभूतेंडोलकर तसेच झेड आर यू सी सी सदस्य  नंदू पावगी ह्यांनी पालघरचे खासदार राजेंद्र गावित  ह्यांची त्यांच्या पालघर येथील निवासस्थानी भेट घेऊन सदरच्या परिस्थितीबाबत चर्चा करून त्यांना निवेदन दिले.

सदर बाबतीत योग्य पाठपुरावा करून संपूर्ण माहिती घेत येत्या काही दिवसांत पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करून पालघरसह इतर कोणत्याही स्थानकावरील मेमू, शटल, पॅसेंजर, मेल-एक्सप्रेस गाड्यांचा एकही थांबा रद्द होता कामा नये, यासाठी जातीने लक्ष घालणार असे खासदार  राजेन्द्र गावीत साहेबांनी सांगितले.

सफाळे पालघर

प्रतिनिधी - रविंद्र घरत

_______