दिवाळी सणाला शेतकर्‍यांना पीक विमा व पीक कर्जा तात्काळ वाटप करा - ऍड. कु. प्रेरणा सूर्यवंशी

कोरोना व सततच्या परतीच्या पावसामुळे शेतकर्‍यांच्या पिकांचे पंचनामे तात्काळ करुन पीक विमा व पीक कर्ज तात्काळ वाटप करावे अशी मागणी संस्थापक अध्यक्ष, मॉसाहेबप्रेरणा सामाजिक संघटना (बीड) ऍड. कु. प्रेरणा सूर्यवंशी यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केली आहे.

दिवाळी सणाला शेतकर्‍यांना पीक विमा व पीक कर्जा तात्काळ वाटप करा - ऍड. कु. प्रेरणा सूर्यवंशी
Immediate distribution of crop insurance and crop loans to farmers on Diwali - Ms. Prerna Suryavanshi

दिवाळी सणाला शेतकर्‍यांना पीक विमा व पीक कर्जा तात्काळ वाटप करा - ऍड. कु. प्रेरणा सूर्यवंशी 

बीड : कोरोना व सततच्या परतीच्या पावसामुळे शेतकर्‍यांच्या पिकांचे पंचनामे तात्काळ करुन पीक विमा व पीक कर्ज तात्काळ वाटप करावे अशी मागणी संस्थापक अध्यक्ष, मॉसाहेबप्रेरणा सामाजिक संघटना (बीड) ऍड. कु. प्रेरणा सूर्यवंशी यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केली आहे.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर व परतीच्या पावसामुळे शेतकर्‍यांचे खुप मोठे नुकसान झाले आहे. लॉकडाऊनच्या काळात उन्हाळी भाजीपाला मार्केट व बाजार बंद असल्याने शेतकर्‍यांना आपला माल बाजारात आणता आला नाही त्यामुळे शेतकर्‍यांचे नुकसान होऊन शिल्लक राहिलेला भाजीपाला जनावारांना टाकावा लागला. ज्या शेतकर्‍यांनी आटोकाट प्रयत्न करुन भाजीपाला बाजारात आणला परंतु वेळेअभावी व कोरोनाचे नियंत्रण अधिकारी व पोलिस यंत्रणा यांच्या दहशतीमुळे तसेच कोरोनाच्या भितीमुळे बाजारात आणलेला भाजीपाला विकता आला नाही. ज्या गरीब शेतकर्‍यांकडे मोटारसायकल व इतर वाहनांची व्यवस्था नव्हती त्यांनी किरायाच्या वाहनाने भाजीपाला आणलेला होता. तो भाजीपाला विकला न गेल्यामुळे तेथेच सोडून जावे लागले. त्यामुळे त्यांना स्वत:च्या टिकीट खर्चासाठी पैसे उरत नव्हते. या झालेल्या नुकसानीमुळे त्यांना खुप मोठे अपयश घेवून निराश व हाताश होवून हवालदीपणे घरी परतावे लागत होते. तसेच ज्या शेतकर्‍यांकडे स्वत:चे वाहन होते. त्यांनाही पेट्रोलसाठी पैसे नव्हते त्यांनी मित्र व नातेवाईकांडून उसने पैसे घेवून घरी जावून शेतकर्‍यांना जनावरांना भाजीपाला टाकावा लागला होता.

अशा प्रकारे शेतकर्‍यांचे मोठे नुकसान होवून हाताश, निराश, हवालदील व कर्जबाजारी झालेले शेतकरी परेशानीत असतांना लगेचच त्यांच्यापुढे रब्बी पीक पेरणी खर्चाचा प्रश्‍न उभा राहिला होता. त्यातच लहान मुलांना ऑनलाईन शिक्षणामुळे मोबाईलचा खर्च वाढला असल्यामुळे शेतकरी आणखीनच खचत गेला आहे. मोबाईलची किंमत त्यांना न परवडणारी असल्यामुळे मुलांच्या शिक्षणाची काळजी व चिंता परत त्यांना लागलेली आहे. या सगळ्या संकटांना तोंड देवून खाजगी सावकरांचे कर्ज काढून कशीबशी पेरणी केली व त्याला कोठेतरी आशेचा किरण दिसू लागला. परंतु त्यात सततच्या मुसळधार पावसाने व परतीच्या आवकाळी पावसाने शेतकर्‍यांच्या पीकांचे आतोनात नुकसान होवून कापूस, बाजरी, सोयाबीन, भाजीपाला, फळबाग अर्थातच सर्व पिकांचे पुर्णपणे नुकसान झालेले आहे. त्यामुळे त्यांना पीक विमा व पीककर्ज हा एकच पर्याय शेतकर्‍यांच्या उभारणीसाठी व जीवन जगण्यासाठी उरलेला आहे. तसेच तोंडावर दिवाळी सण आलेला आहे. त्या सणानिमित्ताने सासरवाशीन मुलींना घरी आणून खर्च करायचा, घरामध्ये चिकनगुनीया, कोरोनाने थैमान घालून घरातील व्यक्तींना दवाखान्यात खर्च करावा लागत आहे. लहान मुलांच्या दिपावली सणानिमित्ताने खुप आपेक्षा आहेत. शेतकरी, शेतमजूर अल्पभूमी शेतकरी असलेल्या कुटूंब प्रमुखाकडे काहीही पैसा शिल्लक नाही आणि कसल्याही प्रकारच्या मार्गाने त्यांच्याकडे पैसा येण्याचा रस्ताच उरलेला नाही कारण या लोकांचा एकमेव व्यवसाय शेती असल्यामुळे त्यांचे जीवन शेतीवर अवलंबून आहे.

भारत देश हा कृषी व पुरुषप्रधान आहे. शेतीचे आतोनात नुकसान झाल्यामुळे शेतीप्रधान असलेल्या भारत देशातील पुरुषप्रधान कुटूंब प्रमुखावर आतोनात ताण पडलेला आहे व तो बेहाल झालेला आहे. अशा या शेतकरी, शेतमजूर, अल्पभूमीधारक शेतकरी कुटूंब प्रमुखाला पीक विमा व पीक कर्जाशिवाय पर्याय नाही. त्यामुळे शेतकर्‍यांच्या पीकांचे पंचनामे कृषी व महसुल विभागाने तात्काळ करुन सरकारला आहवाल सादर करावा. नॅशनल हायवे, राज्य मार्गावर असलेल्या टोल नाक्यांना कोरानाच्या पार्श्‍वभूमीवर नुकसान भरपाई म्हणून 130 कोटीचे आसपास देण्याचा जो प्रस्ताव राज्य सरकारने तयार केलेला आहे. तो रद्द करुन जगाचा पोशींदा असलेल्या गरीब शेतकर्‍यांना वाढीव पीक कर्ज व पीक विमा देण्यात यावी अशी मागणी मॉसाहेबप्रेरणा सामाजिक संघटनेच्या संस्थापक अध्यक्षा ऍड. कु. प्रेरणा सूर्यवंशी यांनी दिलेल्या प्रसिध्दी पत्रकाद्वारे केली आहे.

बीड 

प्रतिनिधी - विश्वनाथ शरणांगत

___________