तरुणांच्या वाढत्या मृत्युचे कारणही त्यातच दडलंय…

कोरोनाच्या पहिल्या लाटेत ज्येष्ठ नागरिक डेंजर झोनमध्ये होते. दुसऱ्या लाटेत तरुण वर्ग डेंजर झोनमध्ये आहे.

तरुणांच्या वाढत्या मृत्युचे कारणही त्यातच दडलंय…
covid19 death news

तरुणांच्या वाढत्या मृत्युचे कारणही त्यातच दडलंय…

The cause of increasing youth deaths is also hidden in it.

कोरोनाच्या पहिल्या लाटेत ज्येष्ठ नागरिक डेंजर झोनमध्ये होते. दुसऱ्या लाटेत तरुण वर्ग डेंजर झोनमध्ये आहे.

कोरोनाच्या पहिल्या लाटेत ज्येष्ठ नागरिक डेंजर झोनमध्ये होते. दुसऱ्या लाटेत तरुण वर्ग डेंजर झोनमध्ये आहे. आतापर्यंतच्या मृत्युचे प्रमाण पाहिले तर हे सहज दिसून येईल. काय आहे तरुणांच्या वाढत्या मृत्युचे कारण ? कसे टाळता येतील हे मृत्यु ? 2020 च्या मार्चमध्ये इंडोनेशियातल्या एका हॉस्पिटलमध्ये एक कोरोनाचा रुग्ण दाखल झालेला होता. त्याला खोकला आणि ताप होता.

वैद्यकीयदृष्ट्या तो ठीकठाक होता. तो नीटपणे चालू शकत होता, बोलत होता, मोबाईलवर स्क्रोल करुन सारं पाहात होता..त्याचा बीपी आणि शरीरातला तापसुद्धा नॉर्मल होता. एकूणच तो रुग्ण असला तरी सामान्य माणसाप्रमाणंच दिसत होता. पण डॉक्टरांनी जेव्हा त्याची ऑक्सिजन पातळी चेक केली तेव्हा ती 77 पर्यंत घसरली होती. 95 ते 98 पर्यंत ऑक्सिजन लेवल नॉर्मल समजली जात होती, पण या कोरोना रुग्णाची ऑक्सिजन लेवल 77 होती.

कोरोनाच्या पहिल्या लाटेतली ही दुर्मिळ केस होती, जिथे रुग्णाचं शरीर ऑक्सिजन मागत होतं आणि रुग्णाला त्याचा पत्ताच नव्हता म्हणजे ऑक्सिजन कमतरतेची कसलीही बाह्यलक्षणे त्याच्यात दिसून येत नव्हती. या पेशंटच्या रुपानं जगाला हॅपी हिपोक्सियाची जाणीव झाली आणि तेव्हापासून हा शब्द वापरात आला.

एखाद्या व्यक्तीच्या रक्तातली ऑक्सिजन लेवल साधारण ऑक्सिजन लेवलपेक्षा कमी होते, त्याला हिपोक्शिया म्हणतात. धडधाकट आणि सुदृढ व्यक्तीची ऑक्सिजन लेवल 94 पेक्षा जास्त असते. ऑक्सिमीटरच्या सहाय्यानं ही ऑक्सिजन लेवल मोजली जाते. रक्तातल्या ऑक्सिजनची लेवल कमी झाली तर हृदय, फुफ्फुसे, मेंदू आणि किडनीला धोका निर्माण होतो. नाकावाटे घेतलेल्या श्वासातून ऑक्सिजन फुफ्फुसांनी अबसॉर्ब करुन तो रक्ताच्या धमन्यांवाटे शरीराच्या सर्व भागात पसरवला नाही तर हिपोक्सियाची स्थिती निर्माण होते. ब्लॉकेजेसमुळंही बऱ्याचदा धमन्यांमधून रक्ताभिसरण नीटपणे होत नसेल तर हिपोक्सियाची स्थिती निर्माण होते.

कोरोना विषाणू फुफ्फुस आणि धमन्यांना लक्ष्य करतो. कोरोनामध्ये फुफ्फुसांना संसर्ग होतो, संसर्गामुळे फुफ्फुसाचे काम करणे कमी होते, त्यामुळं धमन्यांमध्ये ब्लॉकेजेस निर्माण होतात, ब्लॉकेजेसमुळे हृदय, मेंदूसह संपूर्ण शरीरात धावणारं रक्त हळूहळून थांबतं आणि रुग्ण गंभीर होतो. कोरोनापूर्वीही रुग्णांमध्ये हिपोक्शिया दिसायचा. हिपोक्शिया असलेल्या रुग्णाचे रुग्णाचे डोके खूप दुखते, श्वास घ्यायला त्रास होतो, त्यामुळं अस्वस्थता वाढते. पण कोरोनाकाळात समोर आलेल्या हॅपी हिपोक्शियात वरवर सगळं नॉर्मल दिसतं.

जागतिक आरोग्य संघटनेमध्ये सहा वर्षे काम केलेले आणि बिहारच्या भागलपूरमधल्या नेहरु मेडिकल कॉलेजमधले प्रोफेसर डॉ. राजकमल चौधरी यांनी कोरोना रुग्णांमधली ही हॅपी हिपोक्शियाची स्थिती अत्यंत गंभीर आहे असं म्हंटलंय. अशा रुग्णांनी तातडीनं हॉस्पिटलमध्ये दाखल झालं पाहिजे असं ते म्हणाले. हॅपी हिपोक्शियाच्या रुग्णांची ऑक्सिजन लेवल 20% ते 30% ने कमी होते .

सध्या मृत्युचं ते एक कारण बनलंय असं डॉ. चौधरी म्हणाले. दिल्ली आणि NCR भागात तरुणांमध्ये हा हॅपी हिपोक्शिया दुसऱ्या लाटेत अधिक आढळत असल्याचं तिथल्या डॉक्टरांनी सांगितलं. पहिल्या लाटेत वृद्ध आणि ज्येष्ठांना धोका होता, दुसऱ्या लाटेत तरुणांची मृत्युसंख्या अधिक आहे. तरुणांच्या वाढत्या मृत्युचे कारण हे हॅपी हिपोक्शियाच असल्याची शक्यता अनेकांना वाटते.

कोरोना रुग्णांनी त्यांनी ऑक्सिजन लेवल वरचेवर चेक करत राहिली पाहिजे. ऑक्सिजन लेवल 90 च्या खाली जात असेल तर तातडीनं कृत्रिम ऑक्सिजन पुरवला पाहिजे, कारण ऑक्सिजन लेवल घसरत गेली तर त्याचा महत्वाच्या अवयवांवर विपरीत परिणाम होतो.

कोरोना रुग्णांत घश्याची खवखव, खोकला, ताप, डोकेदुखी अशी प्रमुख लक्षणे दिसतात. पण हॅपी हिपोक्शियाच्या लक्षणांवर बारीक नजर ठेवणं गरजेचं आहे. त्याची लक्षणे म्हणजे ओठांचा नैसर्गिक रंग जाऊन तो निळा होणं, त्वचेचा रंगही लाल किंवा जांभळा होणं, काम किंवा मेहनतीचं काही करत नसतानासुद्धा घाम येणं.

कोरोना रुग्णांनी या लक्षणांवर नजर ठेवत ऑक्सिमीटरने ऑक्सिजन लेवल चेक करत राहणं हा सर्वोत्तम पर्याय आहे.