छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात उभारण्यात आलेल्या कोविड हॉस्पीटलचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री  करणार उद्घाटन

छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयातील उभारण्यात आलेल्या सुसज्ज कोविड हॉस्पीटलचे ऑन लाईन उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजितदादार यांच्या शुभ हस्ते शुक्रवार  दि. 9 ऑक्टोबर 2020 रोजी दुपारी 2 वाजता होणार आहे...

छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात उभारण्यात आलेल्या कोविड हॉस्पीटलचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री  करणार उद्घाटन
covid Hospital set up at Chhatrapati Shivaji Maharaj Museum The Chief Minister and Deputy Chief Minister will inaugurate on October 9

छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात उभारण्यात आलेल्या कोविड हॉस्पीटलचे दि. 9 ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री  करणार उद्घाटन

सातारा : छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयातील उभारण्यात आलेल्या सुसज्ज कोविड हॉस्पीटलचे ऑन लाईन उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजितदादार यांच्या शुभ हस्ते शुक्रवार  दि. 9 ऑक्टोबर 2020 रोजी दुपारी 2 वाजता होणार आहे. पवा या कार्यक्रमाचे अध्यक्ष  विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर असणार आहेत.

यावेळी  पालकमंत्री बाळासाहेब पाटील, गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई, जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कबुले,  खा. श्री. छत्रपती उदयनराजे भोसले, खा. श्रीनिवास पाटील,  खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर, आ. शशिकांत शिंदे, आ. मोहनराव कदम, आ. पृथ्वीराज चव्हाण, आ. छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, आ. जयकुमार गोरे, आ. महेश शिंदे, आ. मकरंद पाटील, आ. दिपक चव्हाण आदी उपस्थित राहणार आहेत.

या हॉस्पीटलमध्ये 234 ऑक्सीजन बेड व 52 आयसीयु बेड  आहेत. डायलिसीस असणाऱ्या रुग्णांना रुग्णालये घेत नाहीत अशा रुग्णांसाठीही 4 बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. रुग्णांची तपासणी करुन या रुग्णालयात रुग्णांवर उपचार केले जाणार आहेत.

सातारा 
प्रतिनिधी - उमेश चव्हाण 

___________

Also see : लोकजनशक्ती पार्टीच्या वतीने हाथरस पीडितेवरील अत्याचाराचा निषेध

https://www.theganimikava.com/Protest-against-atrocities-on-Hathras-victim-on-behalf-of-Lok-Janshakti-Party