यूरियासारखं इतर खतांवर सबसिडी द्या

बळीराजा खतांच्या वाढलेल्या किमतीमुळे अजून अडचणीत सापडला आहे, असं दादा भुसे म्हणाले.

यूरियासारखं इतर खतांवर सबसिडी द्या
covid 19 update

यूरियासारखं इतर खतांवर सबसिडी द्या

Subsidize other fertilizers like urea

बळीराजा खतांच्या वाढलेल्या किमतीमुळे अजून अडचणीत सापडला आहे, असं दादा भुसे म्हणाले.

डीएपीच्या किमती कमी करा, यूरियासारखं इतर खतांवर सबसिडी द्या, दादा भुसेंचं केंद्राला पत्रकोरोनामुळे आधीच संकटात सापडलेला बळीराजा खतांच्या वाढलेल्या किमतीमुळे अजून अडचणीत सापडला आहे. गेल्या काही दिवसात रासायनिक खतांचा किमती वाढल्या असून शेतकऱ्यांचा खर्च वाढला आहे. पिकवलेल्या शेतमालाला भाव योग्य भाव मिळत नाही तर दुसरीकडे मात्र उत्पादनाचा खर्च वाढल्याने शेतकरी वर्गात संताप आहे. याविषयी महाराष्ट्राचे कृषी मंत्री दादा भुसे यांनी केंद्र सरकारला पत्र लिहिलं आहे. 


डीएपी खतांची वाढलेली किंमत कमी करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. डीएपी खतांच्या किमती वाढल्यानं शेतकरी संताप व्यक्त करत आहेत. कृषीमंत्री दादा भूसे यांनी केंद्र शासनाला पत्र लिहून खतांच्या किमती कमी करण्याची मागणी केली आहे. ज्या प्रमाणे युरियाला सबसिडी देण्यात येते त्या प्रमाणे इतर खतांवर ही सबसिडी देण्याची मागणी ही दादा भूसे यांनी केंद्राकडे केली आहे.

खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर यंदा प्रथमच दीड लाख मेट्रीक टन युरियाचा साठा करण्यात येत आहे. एकाच वेळी मागणी वाढली तर तुटवडा जाणवू नये आणि वेळेवर पुरवठा व्हावा यासाठी प्रत्येक जिल्ह्यात बफर स्टॉक केला जात आहे, अशी माहिती दादा भुसे यांनी दिली.


कृषी अधिकाऱ्यांनी वरीष्ठ पातळीवर दर सोमवारी खतांच्या उपलब्धतेबाबत आढावा बैठक घ्यावी. यंदा हवामान विभागाने मान्सून चांगला होईल असा अंदाज वर्तविला आहे. गेल्या वर्षी चांगला पाऊस झाल्याने खतांची मागणी एकाचवेळी वाढली. त्यामुळे काही ठिकाणी तुटवडा जाणवला होता. ही बाब लक्षात घेऊन यंद दीड लाख मेट्रीक टन युरीयाचा अतिरीक्त साठा करण्याचा निर्णय गेतला आहे. त्यासाठी विदर्भ विभागासाठी विदर्भ सहकारी पणन मंडळ आणि महाराष्ट्र कृषी औद्योगिक मंडळ या दोन यंत्रणांच्या सहकार्याने सर्व जिल्ह्यात बफर स्टॉक केला जात आहे, असंही दादा भुसे म्हणाले.


केंद्र शासनाकडून 42 लाख 50 हजार मेट्रीक टन खतं मंजूर केले आहे. सध्या राज्यात 22 लाख 56 हजार मेट्रीक टन साठा शिल्लक असून त्यामध्ये यूरिया 5 लाख 30 हजार मेट्रीक टन, डीएपी 1 लाख 27 हजार मेट्रीक टन.

संयुक्त खते 9 लाख 72 हजार मेट्रीक टन अशा प्रकारे खतांचा साठा उपलब्ध आहे.