बीडच्या वडवणी शहरातील कोविड सेंटरमधील कोरोना रुग्णांचा रस्त्यावर मुक्तसंचार

राज्यात कोरोनाचे हॉटस्पॉट ठरत असलेल्या मुंबईत कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. यामुळे ऑक्सिजनची कमतरता भासत आहे.

बीडच्या वडवणी शहरातील कोविड सेंटरमधील कोरोना रुग्णांचा रस्त्यावर मुक्तसंचार
covid 19 update

बीडच्या वडवणी शहरातील कोविड सेंटरमधील कोरोना रुग्णांचा रस्त्यावर मुक्तसंचार

Free movement of Corona patients on the road at Kovid Center in Wadwani, Beed

राज्यात कोरोनाचे हॉटस्पॉट ठरत असलेल्या मुंबईत कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. यामुळे ऑक्सिजनची कमतरता भासत आहे. 

राज्यात कोरोनाचे हॉटस्पॉट ठरत असलेल्या मुंबईत कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. यामुळे ऑक्सिजनची कमतरता भासत आहे.

यामुळे सरकारकडून ऑक्सिजनची तूट भरुन काढण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. तर दुसरीकडे मुंबई महापालिकेच्या वाट्याचा ऑक्सिजन ठाणे आणि नवी मुंबई महापालिकेने परस्पर त्यांच्याकडे वळवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे आमच्या वाट्याचा ऑक्सिजन आम्हाला द्या, अशी मागणी मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पि. वेलारासू यांनी केली आहे.

मुंबई महापालिकेचे अतिरीक्त आयुक्त पि. वेलारासू यांनी याबाबत अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तसेच कोकण विभागीय आयुक्तांना पत्र लिहिलं आहे. या पत्रात त्यांनी मुंबई महापालिकेच्या वाट्याचा ऑक्सिजन ठाणे आणि नवी मुंबई पालिकेला दिला, असा गंभीर आरोप केला आहे.

कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येमुळे देशात सर्वत्र ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे प्रत्येक राज्य हे आपल्याला ऑक्सिजनचा पुरवठा जास्त कसा होईल यासाठी झगडत आहेत. मात्र या परिस्थितीत पुरवठादार कंपन्यांकडून मुंबई शहरासाठी वितरित झालेला ऑक्सिजन ठाणे आणि नवी मुंबई महापालिकेत परस्पर वळवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

सरकारने गरज आणि रुग्णसंख्येनुसार प्रत्येक शहरासाठी प्राणवायूचा हिस्सा निश्चित केला आहे. त्यानुसार मुंबईसाठी 234 मेट्रिक टन ऑक्सिजन उपलब्ध करण्यात येतो. सतरामदास गॅसेस कंपनीच्या माध्यमातून मुंबई महापालिकेला हा ऑक्सिजन मिळतो.मुंबई महापालिका हा साठा आपली रुग्णालये आणि जम्बो कोरोना केंद्रांना पुरवते.

हीच कंपनी मुंबईप्रमाणेच ठाणे आणि नवी मुंबईला प्राणवायूचा पुरवठा करते. मात्र गेल्या काही दिवसांपासून पुरवठादार कंपनीकडे मुंबईसाठी येणाऱ्या टँकरमधील काही टन ऑक्सिजन हा नवी मुंबई आणि ठाण्यासाठी वळवण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत उत्पादक कंपनीने पाठविलेल्या कागदपत्रांवर उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईच्या हिश्श्याचा तब्बल 114 मेट्रीक टन द्रवरुप प्राणवायू पाच दिवसांमध्ये अद्याप शहरात पोहोचू शकला नाही.

यात जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करावी. तसेच हा मुंबई महापालिकेच्या वाट्याचा ऑक्सिजन त्यांना द्यावा, अशी मागणी मुंबई महापालिकेचे अतिरीक्त आयुक्त पि. वेलारासू यांनी केली आहे.