मदतीसाठी कॅनडाही धावला: 74 कोटी रुपये देणार

भारतात कोरोनाचा हाहाकार उडाल्याने भारताला सावरण्यासाठी रशिया आणि अमेरिकेसारख्या बड्या देशांनी मदतीचा हात पुढे केला आहे.

मदतीसाठी कॅनडाही धावला: 74 कोटी रुपये देणार
covid 19 update

 मदतीसाठी कॅनडाही धावला: 74 कोटी रुपये देणार

Canada also ran for help: Rs 74 crore

भारतात कोरोनाचा हाहाकार उडाल्याने भारताला सावरण्यासाठी रशिया आणि अमेरिकेसारख्या बड्या देशांनी मदतीचा हात पुढे केला आहे.

 कोरोनाचा हाहाकार उडाल्याने भारताला सावरण्यासाठी रशिया आणि अमेरिकेसारख्या बड्या देशांनी मदतीचा हात पुढे केला आहे. त्याचबरोबर आता कॅनडाही भारताच्या मदतीसाठी धावून आला आहे. कॅनडाने भारताला 10 मिलियन डॉलर म्हणजे 74,39,05,000 रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे.

कॅनडाकडून भारताच्या रेड क्रॉस सोसायटीला 10 मिलियन डॉलरचा निधी देण्याची घोषणा केली आहे. कॅनडाच्या आंतरराष्ट्रीय विकास मंत्री करीना गोल्ड यांनी ही घोषणा केली आहे. भारताला कोरोनाच्या संकटातून बाहेर पडण्यासाठी ही मदत देण्यात येत असल्याचं गोल्ड यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, गेल्या चोवीस तासात भारतात 3 हजार 293 लोकांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. कोरोनाने एकाच दिवशी 3 हजार रुग्णांचा मृत्यू होण्याची ही पहिलीच वेळ आहे. तसेच गेल्या 24 तासात देशात कोरोनाचे 3,60,960 नवे रुग्ण सापडले आहेत.

महाराष्ट्रात गेल्या चोवीस तासात कोरोनाचे 66,358 नवे रुग्ण सापडले असून कोरोनामुळे 895 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. उत्तर प्रदेशात चोवीस तासात 32,993 नवे रुग्ण सापडले आहेत. केरळमध्ये 32,819, कर्नाटकात 31,830 आणि राजधानी दिल्लीत कोरोनाचे 24,149 नवे रुग्ण सापडले आहेत.

दिल्लीत गेल्या चोवीस तासात 381 जणांचा मृत्यू झाला आहे. देशात सध्या सक्रिय रुग्णांची संख्या वाढून 29,78,709 झाली आहे. देशात आतापर्यंत 14.78 कोटी कोरोना लसीकरण करण्यात आलं आहे. तसेच आजपासून 18-45 दरम्यानच्या नागरिकांच्या लसीकरणासाठी आजपासून नोंदणी केली जात आहे. 18 वर्षांवरील लोकांना येत्या 1 मे पासून लस देण्यात येणार आहे.

1 मेपासून वय वर्षे 18 हून अधिक असलेल्यांना लस मिळणार आहे. त्यासाठीही कोविन वेब पोर्टलमार्फत नोंदणी करावी लागेल. नोंदणीबद्दलची अफवा पसरली होती. ती 24 एप्रिलपासून सुरू होईल, असं सांगण्यात येत होते. पण सरकारनं 24 नव्हे तर 28 एप्रिलपासून नोंदणी सुरू होईल, असे स्पष्ट केले. आपण कोविन पोर्टलवर लॉगिन करून नोंदणी करू शकता.

कोरोना लस नोंदणी केल्याशिवाय मिळणार नाही, असे केंद्र सरकारने स्पष्ट केलेय. Mygov ट्विटर अकाऊंटमध्ये स्पष्टपणे म्हटले आहे की, 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांसाठी लसीकरण नोंदणी 28 एप्रिलपासून सुरू होईल आणि या लस देण्यास 1 मेपासून सुरुवात होईल. 18-45 वर्षे वयोगटातील लोकांना भेटीशिवाय लसीकरण करण्यास परवानगी दिली जाणार नाही.

45 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांसाठी वॉक इन रजिस्ट्रेशनमध्ये स्पॉट नोंदणीची सुविधा पूर्वीप्रमाणेच सुरू राहील. परंतु जे 18 अधिक आहेत, त्यांच्यासाठी कोव्हिन पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक असेल.

18 ते 45 वर्षे वयोगटातील लोकांची श्रेणी मोठी आहे. त्यामुळे संभाव्य गर्दी टाळण्यासाठी नोंदणीचा ​​आदेश देण्यात आला आहे.