नवी मुंबईत कोरोना योद्धे पोलिसांसाठी विशेष कोव्हिड-१९केअर सेंटर, गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कडून उद्घाटन.

नवी मुंबईत कोरोना योद्धे पोलिसांसाठी विशेष कोव्हिड-१९केअर सेंटर, गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कडून उद्घाटन.

नवी मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाशी सामना करत असताना गेल्या ३ महिन्यात जवळपास ३ हजार पोलिसांना कोरोनाचा संसर्ग झाला.
त्यापैकी ३५ जणांचा दुर्दैवाने मृत्यू झाला. यानंतर तातडीने पोलिसांसाठी खास कोव्हिड केअर सेंटरच्या उभारणी त्यामुळे सर्व पोलीस आयुक्तालय आणि अधीक्षक कार्यालयांना समर्पित कोव्हीड केअर सेंटरला सुरुवात झाली. अखेर गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या हस्ते या सेंटरचे उद्घाटन करण्यात आले. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या माध्यमातून अशा प्रकारचे सेंटर सुरु करण्यात आले.

पोलिसांसाठीच्या या खास कोव्हिड सेंटरमुळे आता पोलिसांवर चांगल्या पद्धतीने उपचार होऊ शकतो, अशी प्रतिक्रिया गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. ते नवी मुंबई पोलीस मुख्यालयात बोलत होते. नेरुळ येथील सावली बिल्डिंगमध्ये ५० खाटांचे डेडिकेटेड कोविड १९ केअर सेंटर उभारण्यात आले आहे. तसेच रोडपाली कळंबोली येथील पोलीस मुख्यालयातील मल्टीपर्पज हॉलमध्येही ५० खाटांचे डेडिकेटेड कोविड १९ केअर सेंटर उभारण्यात आले. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज (१० जून) संध्याकाळी या सेंटरला भेट देऊन औपचारिक याचे उद्घाटन केले.

       

नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात जवळपास ५ हजार कर्मचारी काम करतात. गेल्या ३ महिन्यांपासून कोरनाचा प्रादुर्भाव वाढू नये, त्यासाठी पोलिसांनी खडा पहारा दिला आणि त्यामुळे जवळपास ५० कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली. यामध्ये काही जणांनी कोव्हीडवर मातही केली. पोलिसांना वेळेवर उपचारासाठी नवी मुंबई पोलीस आयुक्त संजय कुमार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस दलात कार्यरत असलेल्या पोलिसांना, कोरोनाची लागण झाल्यास योग्य प्रकारे उपचार व्हावे म्हणून या रुग्णालयांची व्यवस्था करण्यात आली आहे.

नेरुळ येथील सावली बिल्डिंगमध्ये ५० खाटांचे डेडिकेटेड कोविड 19 केअर सेंटरची निर्मिती करण्यात आली आहे. तसेच रोडपाली कळंबोली येथील पोलीस मुख्यालयातील मल्टीपर्पज हॉलमध्ये ५० खाटांचे डेडिकेटेड कोविड -19 केअर सेंटर उभारण्यात आले आहेत. विशेष म्हणजे सदर सेंटरसाठी आयुक्तालयातर्फे फक्त ४ दिवसांमध्ये अत्याधुनिक आठ बाथरूमची सोय करण्यात आलेली आहे. या दोन्ही डेडिकेटेड कोविड -19 केअर सेंटरची घोषणा नवी मुंबई महानगरपालिका आणि पनवेल महानगरपालिकेकडून घोषित करण्यात आलेले आहे.