नगरसेवक अमोल बालवडकर यांचा  'कृतज्ञ दिवाळी 'सरंजाम वाटप उपक्रम...| ५ हजार कुटुंबामध्ये पोचणार दिवाळीचा आनंद... ! | ५ ते ८ नोव्हेंबर दरम्यान बालेवाडी मध्ये आयोजन...

शहर सुधारणा समितीचे माजी अध्यक्ष  आणि भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक अमोल बालवडकर यांच्या वतीने   'कृतज्ञ दिवाळी 'सरंजाम वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

नगरसेवक अमोल बालवडकर यांचा  'कृतज्ञ दिवाळी 'सरंजाम वाटप उपक्रम...| ५ हजार कुटुंबामध्ये पोचणार दिवाळीचा आनंद... ! | ५ ते ८ नोव्हेंबर दरम्यान बालेवाडी मध्ये आयोजन...
Corporator Amol Balwadkar's 'Grateful Diwali' equipment distribution program ... | Happy Diwali to reach 5,000 families ...! | Organized in Balewadi from 5th to 8th November ...

नगरसेवक अमोल बालवडकर यांचा  'कृतज्ञ दिवाळी 'सरंजाम वाटप उपक्रम...

 ५ हजार कुटुंबामध्ये पोचणार दिवाळीचा आनंद... !

५ ते ८ नोव्हेंबर दरम्यान बालेवाडी मध्ये आयोजन...

पुणे : शहर सुधारणा समितीचे माजी अध्यक्ष  आणि भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक अमोल बालवडकर यांच्या वतीने   'कृतज्ञ दिवाळी 'सरंजाम वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या सरंजाम मध्ये दिवाळी साठी जीवनोपयोगी साहित्य असणार आहे. ५ हजार कुटुंबामध्ये दिवाळीचा आनंद पोहोचविण्याचे उद्दिष्ट ठेवून   ५ ते ८ नोव्हेंबर दरम्यान बालेवाडी मध्ये आयोजन  या कृतज्ञता महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. 

'कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर सर्व क्षेत्रात असलेली मंदी पाहता सर्व कुटुंबियांना दिवाळी चे नियोजन करताना अडचणी येत आहेत. दिवाळी सणाच्या दिवसात हे अडचण ,नैराश्याचे मळभ दूर करण्यासाठी आम्ही पुढाकार घेत आहोत',असे नगरसेवक अमोल बालवडकर यांनी सांगितले.

५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता या उपक्रमाचे उदघाटन भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या हस्ते होणार आहे. बालेवाडी येथील भारती विद्यापीठ शाळेच्या मैदानात हा उपक्रम होणार आहे.

नगरसेवक अमोल बालवडकर यांनी ही माहिती पत्रकाद्वारे दिली. या उपक्रमात सोशल डिस्टंसिंग चे सर्व नियम पाळण्यात येणार आहेत,सर्वांची दिवाळी निरामय आरोग्याची जावी , याची काळजी घेतली जाणार आहे ,असेही बालवडकर यांनी सांगितले.  

बीड 

प्रतिनिधी - विश्वनाथ शरणांगत

_________