कोरोनाबळींची संख्याही घसरली

भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा आता 2 कोटी 88 लाख 9 हजार 339 वर गेला आहे.

कोरोनाबळींची संख्याही घसरली
corona update

कोरोनाबळींची संख्याही घसरली

 भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा आता 2 कोटी 88 लाख 9 हजार 339 वर गेला आहे.

देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत  मोठी घट पाहायला मिळत आहे. गेल्या 24 तासात आदल्या दिवसाच्या तुलनेत कोरोना बाधितांच्या संख्येत 6 हजारांनी घट झाली आहे. कालच्या दिवसात 1 लाख 14 हजार 460 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली.(The number of coronaries also declined)

कालच्या दिवसात 2 हजार 677 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले आहेत. नव्या कोरोनाग्रस्त रुग्णसंख्येत घट होत असल्याने दिलासा व्यक्त केला जात आहेगेल्या 24 तासात भारतात 1 लाख 14 हजार 460 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 2 हजार 677 रुग्णांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात देशात 1 लाख 89 हजार 232 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.

देशात 24 तासात नवे रुग्ण 1,14,460

देशात 24 तासात डिस्चार्ज 1,89,232

देशात 24 तासात मृत्यू  2677

एकूण रूग्ण  2,88,09,339

एकूण डिस्चार्ज 2,69,84,781

एकूण मृत्यू 3,46,759

एकूण अॅक्टिव्ह रुग्ण  14,77,799

आतापर्यंत लसीकरण झालेली संख्या  23,13,22,417

भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा आता 2 कोटी 88 लाख 9 हजार 339 वर गेला आहे. देशात 2 कोटी 69 लाख 84 हजार 781 रुग्ण बरे झाले आहेत.(The number of coronaries also declined)

आतापर्यंत 3 लाख 46 हजार 759 रुग्णांनी कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. तर 14 लाख 77 हजार 799 इतके सध्याच्या घडीला सक्रिय रुग्ण आहेत.