परदेशी विद्यार्थ्यांनी WHO नं मंजुरी दिलेलं वॅक्सिन घ्यावं

शिक्षण संस्थांनी जागतिक आरोग्य संघटनेने मंजुरी दिलेली कोरोना प्रतिबंधक घेण्यास परदेशी विद्यार्थ्यांना सांगितलं आहे

परदेशी विद्यार्थ्यांनी WHO नं मंजुरी दिलेलं वॅक्सिन घ्यावं
corona update

परदेशी विद्यार्थ्यांनी WHO नं मंजुरी दिलेलं वॅक्सिन घ्यावं

शिक्षण संस्थांनी जागतिक आरोग्य संघटनेने मंजुरी दिलेली कोरोना प्रतिबंधक घेण्यास परदेशी विद्यार्थ्यांना सांगितलं आहे.

भारत बायोटेकची कोवॅक्सिन आणि रशियाच्या स्पुतनिक वी लसीबाबत अमेरिकन शिक्षणसंस्थांनी वेगळी भूमिका घेतली आहे. कोवॅक्सिन आणि स्पुतनिक वी लस घेतलेल्या विद्यार्थ्यांना अमेरिकन शिक्षणसंस्थानी पुन्हा एकदा लसीकरण करण्यास सांगितलं आहे. अमेरिकेतील शिक्षणसंस्थांच्या भूमिकेमुळे विद्यार्थ्यांसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. (Foreign students should get WHO approved vaccine)


वृत्तसंस्था एएनआयनं न्यूयॉर्क टाईम्सच्या रिपोर्टच्या हवाल्यानं बातमी दिली आहे. भारतातील मिलोनी दोशी या विद्यार्थिनीनं कोवॅक्सिन लसीचे दोन डोस घेतलेले आहेत. कोलंबिया विद्यापीठातील स्कूल ऑफ इंटरनॅशनल अँड पब्लिक अफेअर्स या अभ्यासक्रमासाठी तिला अमेरिकेला जायचं आहे.कोलंबिया विद्यापीठाकडून तिला दुसरी लस घेण्यास सांगण्यात आलं आहे. अमेरिकेबाहेर राहून ज्या विद्यार्थ्यांनी जागतिक आरोग्य संघटनेनेने मान्यता न दिलेली लस घेतली असेल त्यांना 28 दिवस आणखी वाट पाहावी लागणार आहे. अमेरिकेतील एफडीए या संस्थेने मंजुरी दिलेली लस त्या विद्यार्थ्यांना घ्यावी लगाणार आहे.


 या लसींना जागतिक आरोग्य संघटनेने मंजुरी दिलेली आहे. अमेरिकेत शिकण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यासमोर लसीकरणाची अट ठेवली गेली आहे. अमेरिकन काऊन्सिल ऑन एज्युकेशनचे सिनीअर व्हाईस प्रेसिडंट टॅरी डब्लू हार्टेल यांनी परदेशातील विद्यार्थ्यांनी अमेरिकेत शिक्षणासाठी यावं. (Foreign students should get WHO approved vaccine)

भारतातून अमेरिकेत दरवर्षी जवळपास 2 लाख विद्यार्थी शिक्षणासाठी जातात.