खराब व्हेंटिलेटर्स मिळाले म्हणून थेट केंद्रावर आरोप

वडील एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी लहानपणापासूनच राजकारणाचे धडे गिरवले.

खराब व्हेंटिलेटर्स मिळाले म्हणून थेट केंद्रावर आरोप
corona update

खराब व्हेंटिलेटर्स मिळाले म्हणून थेट केंद्रावर आरोप

Allegations directly to the center as received bad ventilators

वडील एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी लहानपणापासूनच राजकारणाचे धडे गिरवले.

पीएम केयर्स फंडातून महाराष्ट्राला पुरवण्यात आलेले अनेक व्हेंटिलेटर्स हे सदोष आहे. ते निम्म्या क्षमतेनेच काम करु शकतात, असा गंभीर आरोप शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे  यांनी नुकताच केला होता. केंद्र सरकारवर अशाप्रकारे थेट आरोप केल्यामुळे श्रीकांत शिंदे चांगलेच चर्चेत होते.

श्रीकांत शिंदे हे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांचे पूत्र आहेत. 2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी कल्याण लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवला आहे. गेल्या साडेसहा वर्षांच्या कार्यकाळात श्रीकांत शिंदे यांनी ठाणे लोकसभा मतदारसंघात बऱ्यापैकी जम बसवला आहे.

नवी मुंबईच्या डी.वाय. पाटील महाविद्यालयातून एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केले. वडील एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी लहानपणापासूनच राजकारणाचे धडे गिरवले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी काही काळ समाजकार्य केले. त्यानंतर 2014 मध्ये थेट लोकसभेच्या रिंगणात उतरून त्यांनी लोकसभेत प्रवेश केला. आपल्या साडेसहा वर्षांच्या काळात श्रीकांत शिंदे यांनी अनेक संसदीय समित्यांचे सदस्य म्हणून काम पाहिले आहे.


पंतप्रधान निधीतून कोरोना रुग्णांवरील उपचारासाठी उपलब्ध झालेले व्हेटींलेटर  केवळ 50 टक्के क्षमतेनेच काम करत असल्याचा धक्कादायक आरोप शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांनी केला होता. ही बाब खरी असेल तर रुग्णांच्या जीवितास धोका आहे. हे व्हेंटीलेटर 100 टक्के क्षमेतने चालणारे हवेत. यासंदर्भात राज्य सरकारकडून चौकशी केली जावी.


मध्यंतरी ठाण्यात श्रीकांत शिंदे यांच्याबाबत घडलेला एक किस्सा बराच गाजला होता. ठाण्यात श्रीकांत शिंदे यांचे वडील एकनाथ शिंदे यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्या तुलनेत श्रीकांत शिंदे यांना स्वत:चा म्हणावा तसा जम बसवता आलेला नाही.

काही महिन्यांपूर्वी पत्री पुलाच्या उद्घाटनाच्या मुद्यावरुन शिवसेना-भाजपमध्ये टोकाचे राजकारण रंगले होते. दोन्ही पक्षांमध्ये चांगलीच जुंपली होती. अशा परिस्थितीत भाजपने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमाला श्रीकांत शिंदे यांनी अचानक हजेरी लावली होती.

भाजपने कल्याणच्या पत्रीपुलाजवळ नवीन पूल आणि पोहोच रस्त्याला जोडणाऱ्या चौकाला नामकरण करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. हा कार्यक्रम स्थानिक भाजप नगरसेविका रेखा चौधरी यांनी आयोजित केला होता. या चौकाला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले नाव देण्यात आले. भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.

मात्र कार्यक्रम सुरू असताना अचानक शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचले. खासदार श्रीकांत शिंदे यांनी माईक हातात घेऊन चौका संदर्भात भाषण दिले. मला बोलावले नसले तरी मी आलो. सोशल डिस्टन्सिंग किती जरी असली तरी एकमेकांमध्ये डिस्टन्स ठेवू नका.


शिवजयंतीनिमित्त किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी असलेल्या परिसरात करण्यात आलेल्या विद्युत रोषणाईवरुन खासदार छत्रपती संभाजीराजे MP sambhaji raje यांनी टीका केल्यानंतर वादंग निर्माण झाला होता. ही रोषणाई शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांच्या फंडातून करण्यात आली होती. त्यामुळे छत्रपती संभाजीराजे यांच्या टीकेनंतर श्रीकांत शिंदे नाराज झाले होते.

त्यानंतर श्रीकांत शिंदे यांनीही संभाजीराजे यांना प्रत्युत्तर दिले होते. दृष्टीकोन पॉझिटिव्ह ठेवला, तर सगळं पॉझिटिव्ह दिसतं, दृष्टीकोन निगेटिव्ह ठेवला, तर सगळं निगेटिव्ह दिसेल, असा टोला श्रीकांत शिंदे यांनी लगावला होता.

यानंतर संभाजीराजे यांनी आपली बाजू स्पष्ट केली होती. रायगड किल्ल्यावरील विद्युत रोषणाईसंदर्भात मी टीका केल्यानंतर अनेक शिवभक्तांच्या मनात संभ्रम निर्माण झाला होता. 

मी तेव्हा पुरातत्व खात्याला फटकारले होते. खासदार श्रीकांत शिंदे यांना धारेवर धरण्याचा प्रश्नच येत नाही, असे संभाजीराजे यांनी सांगितले होते.