कोरोना संकटकाळात काँग्रेस नेत्याचं पंतप्रधान आणि उपराष्ट्रपतींना पत्र

देशातील कोरोना स्थितीवर चर्चा करण्यासाठी सर्वपक्षीय बैठक आणि संसदेच्या स्थायी समित्यांची एक बैठक बोलावण्यात यावी, अशी मागणी खर्गे यांनी आपल्या पत्रातून केली आहे.

कोरोना संकटकाळात काँग्रेस नेत्याचं पंतप्रधान आणि उपराष्ट्रपतींना पत्र
corona update

कोरोना संकटकाळात काँग्रेस नेत्याचं पंतप्रधान आणि उपराष्ट्रपतींना पत्र

Letter from the Congress leader to the Prime Minister and Vice President during the Corona Crisis

देशातील कोरोना स्थितीवर चर्चा करण्यासाठी सर्वपक्षीय बैठक आणि संसदेच्या स्थायी समित्यांची एक बैठक बोलावण्यात यावी, अशी मागणी खर्गे यांनी आपल्या पत्रातून केली आहे.

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. कोरोना रुग्णसंख्येसह मृत्यूचं प्रमाणही चिंताजनक बनत चाललं आहे. अशावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना पत्र लिहिलं आहे. देशातील कोरोना स्थितीवर चर्चा करण्यासाठी सर्वपक्षीय बैठक आणि संसदेच्या स्थायी समित्यांची एक बैठक बोलावण्यात यावी, अशी मागणी खर्गे यांनी आपल्या पत्रातून केली आहे.

खर्गे यांनी कोरोना संकटातून वाचण्यासाठी पंतप्रधान मोदी यांना काही महत्वाच्या सूचनाही केल्या आहे. त्यात प्रामुख्याने देशातील सर्व नागरिकांना लस देण्यासाठी केंद्रीय अर्थसंकल्पातील 35 हजार कोटी रुपयांचा उपयोग करा. सोबतच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदाची सीमा 200 दिवसांपर्यंत वाढवण्याचा सल्ला दिला आहे.

त्याचबरोबर मदत निधी आणि यंत्रणेच्या वितरणात गती आणण्याची सूचना केली आहे. सोबतच लसींचं उत्पादन वाढवणं, महत्वपूर्ण मेडिकल उपकरण व्हॅक्सिनवर 5 टक्के, पीपीई किटवर 5 ते 12 टक्के, रुग्णावाहिकेवर 28 टक्के आणि ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटरवर 12 टक्के कर हटवण्याची मागणीही खर्गे यांनी केली आहे.

शनिवारी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनीही करोना स्थितीवर चर्चा करण्यासाठी एक सर्वपक्षीय बैठक आणि संसदेच्या आरोग्य समितीची बैठक बोलावण्याची मागणी केली होती. सोनिया यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं आहे.

राजस्थान राज्य आरोग्य विमा कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुणा राजोरिया यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत. त्यानुसार स्थानिक जिल्हा प्रशासनाने मुख्यमंत्री चिरंजीवी आरोग्य विमा योजनेशी जोडले गेलेल्या कोरोना रुग्णांना सर्व खासगी रुग्णालयात मोफत उपचार मिळेल याकडे लक्ष द्यावं अशी सूचना करण्यात आली आहे. या योजनेशी जोडले गेलेल्या कोरोना रुग्णाच्या उपचारासाठी एखाद्या रुग्णालयाने नकार दिला तर त्या रुग्णालयाविरोधात कठोर पाऊल उचलावे, असे आदेशही देण्यात आले आहेत.

लसीकरणासाठी वयाची अट न घालता गरज ओळखून या मोहिमेचा विस्तार केला जावा, अशी प्रमुख मागणी सोनिया गांधी यांनी पंतप्रधानांकडे केलीय. तसंच राज्यातील संसर्गाचा धोका ओळखून त्यांना लसीचा पुरवठा केला जावा.

तसंच अन्य कंपन्यांच्या लसींचा वापर करण्याची परवानगी मिळावी, अशी मागणीही सोनिया गांधी यांनी पंतप्रधानांकडे केली आहे.