कोरोनापासून लढण्यासाठी DRDO च्या आणखी एका औषधाला मंजुरी

रुग्णांचा कोरोना रिपोर्ट फारच कमी वेळेत ‘निगेटिव्ह’ येत आहे. त्यामुळे ते लवकर बरे होत आहेत. विशेष म्हणजे हे औषध घेतल्यानंतर तिसऱ्या दिवशी त्यांना मेडिकल ऑक्सिजनाचा सपोर्टवरुन हटवण्यात आले आहेत.

कोरोनापासून लढण्यासाठी DRDO च्या आणखी एका औषधाला मंजुरी
Corona Death

कोरोनापासून लढण्यासाठी DRDO च्या आणखी एका औषधाला मंजुरी

Approves another DRDO drug to fight corona

रुग्णांचा कोरोना रिपोर्ट फारच कमी वेळेत ‘निगेटिव्ह’ येत आहे. त्यामुळे ते लवकर बरे होत आहेत. विशेष म्हणजे हे औषध घेतल्यानंतर तिसऱ्या दिवशी त्यांना मेडिकल ऑक्सिजनाचा सपोर्टवरुन हटवण्यात आले आहेत.

या औषधाचा वापर करणाऱ्या कोरोना रुग्णांवर इतर करोनाबाधित रुग्णांपेक्षा कमी वेळेत परिणाम दिसून येत आहे. या रुग्णांचा कोरोना रिपोर्ट फारच कमी वेळेत ‘निगेटिव्ह’ येत आहे. त्यामुळे ते लवकर बरे होत आहेत. विशेष म्हणजे हे औषध घेतल्यानंतर तिसऱ्या दिवशी त्यांना मेडिकल ऑक्सिजनाचा सपोर्टवरुन हटवण्यात आले आहेत. तसेच त्यांचा प्रतिसाद चांगला झाला आहे. तर ज्या रुग्णांना हे औषध दिले गेले नाही. 

डीआरडीओच्या वैज्ञानिकांनी एप्रिल 2020 मध्ये लॅबमध्ये या औषधाचा प्रयोग केला होता. कोरोना विषाणूचं सक्रमण रोखण्यासाठी हे औषध प्रभावी ठरत असल्याचं दिसून आलं. याच आधारावर ‘डीसीजीआय’नं मे 2020 मध्ये या औषधाच्या दुसऱ्या टप्प्यातील ट्रायलला मंजुरी दिली होती.

2 डीजी हे औषध पावडरच्या स्वरुपात मिळते. हे औषध त्याला पाण्यात मिसळून रुग्णाला दिलं जातं. हे औषध संक्रमित पेशींत जमा होतं. त्यामुळे विषाणूचं वाढतं संक्रमण रोखण्यात त्याचा उपयोग होतो. रुग्णांच्या शरीरातील संक्रमित पेशी शोधून काढून विषाणूला आळा घालण्यासाठी हे औषध उपयोगी ठरतं. या औषधामुळे रुग्णांचा रुग्णालयातील मुक्काम होऊ शकतो.

देशभरातील अनेक रुग्णालयांत या औषधाची दुसरी ट्रायल पार पडली. ट्रायलसाठी 11 रुग्णालयांतील 110 रुग्णांचा समावेश करण्यात आला होता. मे ते ऑक्टोबर महिन्यात ही ट्रायल पार पडली. तिसऱ्या टप्पा डिसेंबर 2020 ते मार्च 2021 पर्यंत देशातील 27 रुग्णालयांत पार पडला. यात 220 रुग्णांचा समावेश करण्यात आला.

यात ज्या रुग्णांवर ‘2 डीजी’ या औषधाचा वापर करण्यात आला. त्यातील 42 टक्के रुग्णांची ऑक्सिजनवरच अवलंबित्व तिसऱ्या दिवशी संपुष्टात आलं.

डीआरडीओनं जारी केलेल्या माहितीनुसार 2 डेक्सोय डी ग्लुकोजच्या रुग्णांना दिलं गेलं ते रुग्ण वेगानं रिकव्हर होतात. त्याचा बरा होण्याचा वेग नियमितपणे केल्या जाणाऱ्या उपचार पद्धतीपेक्षा चांगला असल्याचा दावा कऱण्यात आला आहे. नियमित उपचार पद्धतीनं रुग्ण बरा होण्यासाठी लागणारा वेळ आणि 2 डेक्सोय डी ग्लुकोज दिलेले रुग्ण बरे होण्याचा वेळ यांच्यामध्ये जवळपास 2.5 दिवसांचा फरक आढळून आल्याचं डीआरडीओकडून सांगण्यात आलेय.

ही ट्रायल महाराष्ट्र, दिल्ली, उत्तर प्रदेश, बंगाल, गुजरात, राजस्थान, आंध्रप्रदेश, तेलंगना, कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये करण्यात आली.