आसाराम बापूला कारागृहात कोरोना

तुरुंगवास भोगत असलेल्या आसाराम बापूला कोरोनाची लागण झाली आहे. यामुळे त्याला उपचारासाठी महात्मा गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

आसाराम बापूला कारागृहात कोरोना
Corona Death

आसाराम बापूला कारागृहात कोरोना

Corona Asaram Bapu in jail

तुरुंगवास भोगत असलेल्या आसाराम बापूला  कोरोनाची लागण झाली आहे. यामुळे त्याला उपचारासाठी महात्मा गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

राजस्थानमधील जोधपूरच्या मध्यवर्ती कारागृहात  तुरुंगवास भोगत असलेल्या आसाराम बापूला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे त्याची प्रकृती खालावली आहे. यामुळे त्याला उपचारासाठी महात्मा गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, आसाराम बापूला गेल्या काही दिवसांपासून कोरोनाची सौम्य लक्षण दिसत होती. सोमवारी 3 मे रोजी त्याची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यानंतर बुधवारी 5 मे रोजी त्याचा कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. यानंतर त्याची प्रकृती बिघडली.

त्याला महात्मा गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याची प्राथमिक तपासणी करुन त्याला आयसीयूमध्ये दाखल केले आहे. अद्याप त्यांच्या प्रकृतीविषयी कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

जोधपूरच्या मध्यवर्ती कारागृहात गेल्या महिन्यात कोरोनाचा विस्फोट झाला होता. या ठिकाणी जवळपास एक डझन कैद्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर या सर्व कोरोना पॉझिटिव्ह कैद्यांना तुरुंगातील दवाखान्यात विलगीकरणात ठेवण्यात आले होते. 

दरम्यान या आधी 18 फेब्रुवारीला छातीत दुखत असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र तपासणी केल्यानंतर काहीही गंभीर आढळले नाही. त्यामुळे दोन दिवसांनंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता. त्यानंतर त्यांची रवानगी पुन्हा जोधपूर मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली होती.

या घटनेवेळी आसाराम बापूचे अनेक अनुयायी मोठ्या संख्येने जेलच्या बाहेर जमले होते. त्यामुळे त्यांना  बाहेर काढण्यासाठी पोलिसांना प्रचंड त्रास सहन करावा लागला होता.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने राजस्थानलाही कोरोनाचा विळखा घातला आहे. राजस्थानमध्ये काल दिवसभरात 16 हजार 815 नवीन कोरोनाबाधित आढळले. ही मे महिन्याच्या पहिल्या पाच दिवसात आढळलेली सर्वात कमी आकडेवारी आहे.

तर दुसरीकडे काल दिवसभरात सर्वाधिक 17,022 रुग्ण बरे झाले आहेत. वैद्यकीय विभागाने याबाबतची आकडेवारी जाहीर केली आहे. तर कोरोना मृत्यूची संख्या चिंताजनक बनली आहे. बुधवारी राज्यात 155 संक्रमित रुग्णांचा मृत्यू झाला. त्यानंतर राज्यात एकूण मृत्यूची संख्या 5021 झाली आहे.

पहिल्या लाटेतील कोरोना आणि सध्याच्या कोरोना विषाणूनध्ये अनेक अंतर आहे. मागील लाटेतील कोरोना विषाणूची लागण झाल्यानंतर रुग्णाच्या शरीरामध्ये कमीत कमी 3 महिन्यांसाठी अँटिबॉडी तयार होतील आणि रुग्ण नंतर कमीत कमी तीन महिन्यांसाठी पुन्हा संक्रमित होणार नाही, असां अंदाज बांधला जायचा.

दुसऱ्या लाटेतील कोरोना विषाणूमध्ये अनेक बदल झाले आहेत. डॉक्टरांनी सांगितल्यानुसार संशोधकांना मागच्या वेळी बांधलेले निष्कर्ष यावेळी लागू होतीलच असे नाही. यावेळी विषाणूमध्ये अनेक अंगांनी बदल झाला आहे. डॉक्टरांनी सांगितल्यानुसार असे अनेक रुग्ण आहेत, ज्यांचा तीन दिवसांच्या आत मृत्यू झाला आहे. तसेच सीटी स्कॅन आणि इतर चाचण्या करण्यापूर्वीच अनेक कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाल्याच्याही घटना घडल्या आहेत.

आजकाल कोरोनाची लागण झाल्याचे समोर आल्यानंतर सुरुवातीच्या दोनच दिवसांत कोरोनाविषयक गंभीर लक्षणं दिसू लागली आहेत. कोरोनाचे रुप बदलल्यामुळे सध्या मृतांचे प्रमाणही वाढले आहे.