पुण्यातही कोरोना सेन्टरमध्ये महिलेचा विनयभंग,आरोपीला अटक.....

पुण्यातही कोरोना सेन्टरमध्ये महिलेचा विनयभंग,आरोपीला अटक.....

पुण्यातही कोरोना सेन्टरमध्ये महिलेचा विनयभंग,आरोपीला अटक..

पुणे : येथील सिंहगड रोड परिसरात क्वारंटाईन केंद्रात एका सुरक्षारक्षकाने महिलेशी अश्लील वर्तन  केल्याचा प्रकार समोर येत आहे. यासंदर्भात २७ वर्षीय महिलेने पोलिसांकडे तक्रार करताच या आरोपीला अटक करण्यात आली आहे. महिलेच्या माहितीनुसार, हा आरोपी महिलेला वारंवार मिस्ड कॉल देत होता, अश्लील मॅसेजेस पाठवत होता इतकंच नव्हे तर रात्रभर महिलेच्या रूम चा दरवाजा सुद्धा ठोठावत होता. सुरुवातीला या प्रकारामुळे साहजिकच ही महिला घाबरून गेली होती मात्र नांतर धीर एकवटून तिने पोलिसांना कॉल करून ही माहिती दिली आणि मग त्वरित ही पुढची कारवाई करण्यात आली. 

हा सर्व प्रकार १६ जुलै रोजी घडल्याचे समजतेय. सदर सुरक्षारक्षकाचं नाव लोकेश मते असून त्याने सुरक्षेचे कारण सांगून सर्व महिलांकडून मोबाईल नंबर घेतला होता. मध्यरात्री एक वाजता त्याने या महिलेला मिस कॉल केला. काही वेळाने त्याने आपल्याला काही अडचण असल्यास सांगा असा मेसेज केला. तिथवर सर्व ठीक असताना त्याने पुढील मॅसेज मध्ये अश्लील शब्द वापरण्यास सुरुवात केली. महिलेने प्रतिसाद न दिल्याने तो सकाळपर्यंत खोलीचा दरवाजा ठोठावत राहिला. 

दरम्यान, महिलेने भारती विद्यापीठ पोलिसांकडे या प्रकरणी तक्रार केली .त्यानंतर आरोपी सुरक्षारक्षकाला अटक करण्यात आली आहे. यापूर्वी सुद्धा अशाच अनेक घटना घडल्या आहेत, कोरोनाच्या संकटकाळात महिला डॉक्टर सुद्धा रात्रपाळी मध्ये काम करत असताना त्यांच्याही बाबत असे प्रकार घडले आहेत असे स्पष्ट झाले आहे.