कोरोनाच्या काळात महिनाभरापासून ग्रामस्थांची पाण्यासाठी वणवण...
भिवंडी शहरातील कामवारी नदी पलीकडे काही अंतरावर असणाऱ्या काटई ग्रामपंचायत हद्दीत मागील कित्येक वर्षांपासून पाणी टंचाईची समस्या उद्भवली आहे. अशातच कोरोनाच्या काळातही गावकऱ्यांना गेल्या एक ते दीड महिन्यापासून पाण्यासाठी वणवण करावी लागत असल्याचे चित्र समोर आले आहे.

कोरोनाच्या काळात महिनाभरापासून ग्रामस्थांची पाण्यासाठी वणवण...
ठाणे : भिवंडी शहरातील कामवारी नदी पलीकडे काही अंतरावर असणाऱ्या काटई ग्रामपंचायत हद्दीत मागील कित्येक वर्षांपासून पाणी टंचाईची समस्या उद्भवली आहे. अशातच कोरोनाच्या काळातही गावकऱ्यांना गेल्या एक ते दीड महिन्यापासून पाण्यासाठी वणवण करावी लागत असल्याचे चित्र समोर आले आहे. तर ऐन दिवाळीच्या सणात पाणी टंचाईने नागरिकांना हाल सोसावे लागत आहेत. त्यामुळे गावकरी आंदोलनाच्या पवित्र्यात असल्याचे सांगण्यात आले.
काटई ग्रामस्थांची पाण्यासाठी वणवणपिण्याचे पाणी विकत घ्यावे लागत असल्याने गावकऱ्यांना आर्थिक झळ काटई ग्रामपंचायत हद्दीतील लोकसंख्या जवळपास २० हजारच्या आसपास असलेल्या नागरी वस्तीत नळ आहेत. पण नळाला पाणी नाही असे चित्र सर्वत्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यापासून गावातील नळाला पाणी नाही त्यामुळे येथील कुटुंबियांना पिण्याचे पाणी फिल्टर प्लांट वाल्यांकडून विकत घ्यावे लागत आहे. तर घरातील सर्व कामे सोडून महिला व पुरुषांना पाण्यासाठी भटकत रहावे लागत आहे. काटई ग्रामपंचायत हद्दीतील गृहिणींना सुद्धा आपल्या घरातील इतर कामे सोडून बोरवेलच्या पाण्यासाठी रांगेत उभे रहावे लागत आहे. तर अनेक जण पाण्याच्या छोट्या टँकरने पाण्याची सोय करीत आहे. गावात बोरवेल पैकी काही बंद आहेत. तर ज्या चालू आहेत त्यांना खारट पाणी येत असल्याने ते खारट पाणी रोजच्या इतर दैनंदिन कामासाठी वापरावे लागते. गावातील पुरुष मंडळी आपल्या दुचाकींचा उपयोग पाणी वाहतूक करण्यासाठी करीत आहेत.
शहरातील अनधिकृत नळ जोडण्यामुळे गावात पाणी.. पाणी वितरण करणाऱ्या स्टेमवॉटर कंपनी कडून ग्रामीण भागातील काही ग्रामपंचायतींना सुद्धा पाणी पुरवठा केला जातो त्यानुसार या ग्रामपंचायतीस स्टेम कडून 1 एमएलटी पाणी मंजूर असून ते भिवंडी शहरातील ज्या भागातून पाईप लाईन द्वारे वितरण केले जाते. त्या भिवंडी शहरातील मिल्लत नगर , संगमपाडा या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अनधिकृत नळ जोडण्या केल्या गेल्याने हे 1 एम एल टी पाणी गावातील टाकीपर्यंत पोहचत नसल्याने संपूर्ण गावाला पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. गावात पाणी येत नसल्याचे येथे राहणाऱ्या कामगार वर्गाचेही मोठे हाल होत आहेत पिण्यासाठी पाणी विकत आणण्यासाठी पैसे खर्च करावे लागत असल्याने ऐन दिवाळीच्या सणात ही पाणी टंचाईने नागरिकांना हाल सोसावे लागत आहेत. त्यामुळे गावकरी आंदोलनाच्या पवित्र्यात असल्याचे सांगण्यात आले.
भिवंडी
प्रतिनिधी - सत्यवान तरे
___________