कोरोना रुग्ण सापडल्याने मुरबाड आरोग्य विभागाला केले सिल !
मुरबाड पंचायत समिती कार्यालया जवळच असलेल्या तालुका आरोग्य अधिकाऱ्यांच्या कार्यालयात गेल्या शुक्रवारी चतुर्थ श्रेणी कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळुन आल्याने संपूर्ण आरोग्य विभाग सिल करण्यात आला होता.

वैशिष्ट्य म्हणजे मुरबाड शहर तसेच तालुक्यात कोरोन रुग्णांची संख्या संपुष्टात आली होती आशातच कोरोना संकटात तालुक्यातील आरोग्य यंत्रणा चांगल्या प्रकारे काम करीत होती म्हणुन मुरबाड शहर तसेच ग्रामीण भागात कोरोना आटोक्यात आला असतांनाच आरोग्य विभागात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला असल्याने परीसरातील कार्यालयाच्या सुरक्षेसाठी आरोग्य विभाग सिल करण्यात आले होते.
संबंधित कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण चतुर्थ श्रेणी कर्मचारी असल्याने त्याचा ईतर किती जणांशी संपर्क आला आहे याचा तपास घेण्यात आला असून आज पासून नियमित पणे आरोग्य विभाग सूरु राहणार असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. श्रिधर बनसोडे यांनी दिली.
मुरबाड
प्रतिनिधी - लक्ष्मण पवार
___________