राज्य सरकारमध्ये आणखी एक मंत्री कोरोना पॉसिटीव्ह ....

राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांना कोरोनाची लागण झाली आहे .

राज्य सरकारमध्ये आणखी एक मंत्री कोरोना पॉसिटीव्ह ....

राज्य सरकारमध्ये आणखी एक मंत्री कोरोना पॉसिटीव्ह ....

मुंबई : राज्यात दिवसेंदिवस कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. या कोरोनाच्या विळख्यात सर्वसामान्य जनतेसह कोरोना योद्धे म्हणून काम करणारे देखील येत आहेत. आता राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री, मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांना कोरोनाची लागण झाली आहे. या संदर्भात अस्लम शेख यांनी ट्वीट करत माहिती दिली आहे.

मी कोरोना पॉझिटिव्ह आढळलो आहे. मला सध्या कोणतीही लक्षणे नसून स्वत:ला विलग (आयसोलेट) करुन घेत आहे. माझ्या निकटच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी कोरोना चाचणी करुन घ्यावी, असे त्यांनी ट्वीट करत म्हटले आहे. मी माझ्या राज्यातील लोकांची सेवा करण्यासाठी घरातून काम करत राहणार आहे, असेही अस्लम शेख यांनी सांगितले आहे.