कोरोनाचे सामोर आले नवीन लक्षणें.....

कोरोना या रोगाचे नवीन लक्षणे सामोर आले हे लक्षणें दिसल्यास लगेच रुग्णालय गाठा !!!

कोरोनाचे सामोर आले नवीन लक्षणें.....

सामोर आले कोरोनाचे नवीन लक्षणं,दिसल्यास लगेच रुग्णालय गाठा...!!

लंडन :  देशांमधील तज्ज्ञ कोरोनावरील औषध शोधण्याच्या मागे आहेत. मात्र अजूनही यावर ठोस औषध मिळू शकलेलं नाही. सर्दी, ताप, खोकला, कफ, घश्यात खवखव अशी लक्षणे आत्तापर्यंत कोरोना रुग्णांमध्ये दिसत होती. मात्र आता त्यात आणखी काही लक्षणांची भर पडलीये. ब्रिटनमध्ये कोरोना रुग्णांमध्ये नवं लक्षणं आढळून आलंय. कोरोना रुग्णांच्या त्वचेवर रॅशेश येत असल्याचं आढळून आलं आहे.

किग्ज कॉलेज ऑफ लंडनच्या डॉक्टरांनी 20 हजार रुग्णांचा अभ्यास करून हे निष्कर्ष काढले आहेत. ब्रिटनमधल्या 9 टक्के लोकांच्या त्वचेवर रॅशेश येत असल्याचं आढळून आलंय. तर 8 टक्के लोकांना इतर लक्षणांसोबतच त्वचेवर रॅशेश असल्याचं दिसून आलं.

प्रत्येक 11 कोरोना रुग्णांमागे एका रूग्णाला त्वचेवर रॅशेश येत असल्याचं आढळलंय.

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, अनेक देशांमध्ये काही लक्षणं वेगवेगळी आढळून आली आहेत. स्थानिक वातावरण, लोकांची जीवनशैली आणि इतर परिस्थितीमुळे काही वेगळी लक्षणं दिसतायत.

गंध न येणं, अशक्तपणा, भूक न लागणं, डायरिया अशीही लक्षणं भारतात आढळून आली आहेत. त्यात आता हे नवं लक्षणं आढळून आल्याने सगळ्यांनाच काळजी घेण्याची गरज असल्याचं तज्ज्ञांनी सांगितलं आहे.