अभिनेत्री रेचल व्हाईट कोरोना पॉसिटीव्ह ...

अभिनेत्री रेचल व्हाईट हिला कोरोनाची लागण झाल्याची बातमी सामोर आली आहे.

अभिनेत्री रेचल व्हाईट कोरोना पॉसिटीव्ह ...

अभिनेत्री रेचल व्हाईट कोरोना पॉसिटीव्ह ...

कोरोनाचा विळखा आता सेलिब्रिटींनाही पडू लागला आहे. अभिनेत्री रेचल व्हाईट हिला कोरोनाची लागण झाली असून तिने ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती चाहत्यांना दिली आहे. रेचलने एक भावूक पोस्ट लिहून म्हटले आहे की, मी कोरोना पॉझिटिव्ह आहे. घरामध्येच क्वारंटाईन आहे. तुमच्या प्रार्थनेमध्ये माझाही समावेश करा, मला कोरोनातून मुक्त होण्यासाठी तुमच्या प्रार्थनेची गरज आहे. तसेच  रेचल व्हाईट यांनी उंगली आणि हर हर ब्योमकेश चित्रपटामध्ये भूमिका साकारल्या आहेत.