राज्यात जानेवारी-फेब्रुवारीमध्ये COVID-19 च्या दुसऱ्या लाटेची शक्यता...

राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असून कोरोना बाधितांची वाढती संख्या नियंत्रणात आली आहे. मात्र असे असले तरी पुढच्या काही महिन्यांमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. यासह येत्या नव्या वर्षात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा होण्याची शक्यता राज्याच्या आरोग्य सेवा संचालनालयाने वर्तवली आहे.

राज्यात जानेवारी-फेब्रुवारीमध्ये COVID-19 च्या दुसऱ्या लाटेची शक्यता...
The possibility of the second wave of COVID-19 in the state in January-February ...
राज्यात जानेवारी-फेब्रुवारीमध्ये COVID-19 च्या दुसऱ्या लाटेची शक्यता...
राज्यात जानेवारी-फेब्रुवारीमध्ये COVID-19 च्या दुसऱ्या लाटेची शक्यता...
राज्यात जानेवारी-फेब्रुवारीमध्ये COVID-19 च्या दुसऱ्या लाटेची शक्यता...
राज्यात जानेवारी-फेब्रुवारीमध्ये COVID-19 च्या दुसऱ्या लाटेची शक्यता...
राज्यात जानेवारी-फेब्रुवारीमध्ये COVID-19 च्या दुसऱ्या लाटेची शक्यता...
राज्यात जानेवारी-फेब्रुवारीमध्ये COVID-19 च्या दुसऱ्या लाटेची शक्यता...

राज्यात जानेवारी-फेब्रुवारीमध्ये COVID-19 च्या दुसऱ्या लाटेची शक्यता...

पिंपरी : राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असून कोरोना बाधितांची वाढती संख्या नियंत्रणात आली आहे. मात्र असे असले तरी पुढच्या काही महिन्यांमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. यासह येत्या नव्या वर्षात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा होण्याची शक्यता राज्याच्या आरोग्य सेवा संचालनालयाने वर्तवली आहे.

मनपा प्रशासनाला पूर्वतयारीची सूचना

त्यासंदर्भात प्रत्येक जिल्हा आणि महापालिका प्रशासनाला खबरदारी म्हणून संभाव्य लाटेची पूर्वतयारी करण्याची सूचना देण्यात आल्या आहेत.”सध्या राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत घट होत असली तर युरोपातील अनेक देशांमध्ये कोरोनाची दुसरी लाट आहे. युरोपियन देशांच्या उदाहरणावरुन भारतात जानेवारी-फेब्रुवारीमध्ये दुसरी लाट येण्याची शक्यता आहे,” असे आरोग्य सेवा संचालनालयाने म्हटले आहे.

दरम्यान, त्यामुळे राज्य सरकारने आरोग्य विभागाला पूर्ण तयारी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याचे परिपत्रक काढण्यात आले आहे. हॉस्पिटल्स, कोविडच्या सुविधा, लागणारी औषधं याचा पुरेसा साठा ठेवण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, ५ नोव्हेंबर रोजी आरोग्य मंत्र्यांसह झालेल्या बैठकीत यासंबंधी चर्चा झाली होती.

आरोग्य सेवा संचालनालयाच्या सूचना

कोरोना रुग्णांची संख्या सध्या कमी असली तर चाचण्या सक्षमपणे सुरु ठेवाव्यात.

अधिक प्रमाणात फ्लू सदृश्य आजार असणारे रुग्ण आढळणाऱ्या भागात चाचण्यांचे प्रमाण वाढवावे.

६० वर्षांवरील आणि अतिजोखमीचे आजार असलेल्या व्यक्तींनी अनलॉकनंतरही आपला जनसंपर्क मर्यादित ठेवावा.

औषधे, साधनसामग्री आणि ऑक्सिजनचा पुरवठा हा बफर स्टॉक म्हणून उपलब्ध ठेवावा.

पिंपरी

प्रतिनिधी - आत्माराम काळे

__________