कल्याण डोंबिवलीत २०३ नवे रुग्ण तर २ मृत्यू...| ५३,७६० एकूण रुग्ण तर १०५७ जणांचा आतापर्यंत मृत्यू...| तर २४ तासांत १०३ रुग्णांना डिस्चार्ज...

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज नव्या २०३ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर दोन जणांचा मृत्यू झाला असून गेल्या २४ तासांत १०३ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.   

कल्याण डोंबिवलीत २०३ नवे रुग्ण तर २ मृत्यू...| ५३,७६० एकूण रुग्ण तर १०५७ जणांचा आतापर्यंत मृत्यू...|  तर २४ तासांत १०३ रुग्णांना डिस्चार्ज...
203 new patients and 2 deaths in Kalyan Dombivali ... | 53,760 total patients and 1057 deaths so far ... | 103 patients discharged in 24 hours ...

कल्याण डोंबिवलीत २०३ नवे रुग्ण तर २ मृत्यू...

५३,७६० एकूण रुग्ण तर १०५७ जणांचा आतापर्यंत मृत्यू...

तर २४ तासांत १०३ रुग्णांना डिस्चार्ज...

कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज नव्या २०३ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर दोन जणांचा मृत्यू झाला असून गेल्या २४ तासांत १०३ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.    

आजच्या या २०३ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या ५३,७६० झाली आहे. यामध्ये १७३७ रुग्ण उपचार घेत असून ५०,९६६ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत १०५७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या २०३ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व- २३, कल्याण प – ५८, डोंबिवली पूर्व – ६६, डोंबिवली प – ४५, मांडा टिटवाळा – २, मोहना – ८ तर पिसवली येथील एका रूग्णांचा समावेश आहे. 

डिस्चार्ज झालेल्या रूग्णांपैकी ८ रुग्ण टाटा आमंत्रामधून,  ५ रुग्ण डोंबिवली जिमखाना कोविड समर्पित रुग्णालयातून, ३ रुग्ण पाटीदार कोविड सेंटर मधून व उर्वरित रुग्ण हे इतर रूग्णालयामधून तसेच होम आयसोलेशन मधून बरे झालेले आहेत.

कल्याण, ठाणे

प्रतिनिधी - कुणाल म्हात्रे 

___________