कल्याण डोंबिवलीत १५२ नवे रुग्ण तर २ मृत्यू...| ५२,६८५ एकूण रुग्ण तर १०४२ जणांचा आतापर्यंत मृत्यू...| तर २४ तासांत १३५ रुग्णांना डिस्चार्ज...

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज नव्या १५२ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर दोन जणांचा मृत्यू झाला असून गेल्या २४ तासांत १३५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 

कल्याण डोंबिवलीत १५२ नवे रुग्ण तर २ मृत्यू...| ५२,६८५ एकूण रुग्ण तर १०४२ जणांचा आतापर्यंत मृत्यू...| तर २४ तासांत १३५ रुग्णांना डिस्चार्ज...
152 new patients and 2 deaths in Kalyan Dombivali ...| A total of 52,685 patients and 1042 deaths so far...| 135 patients discharged in 24 hours ...

कल्याण डोंबिवलीत १५२ नवे रुग्ण तर २ मृत्यू...

५२,६८५ एकूण रुग्ण तर १०४२ जणांचा आतापर्यंत मृत्यू...

 तर २४ तासांत १३५ रुग्णांना डिस्चार्ज...

कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज नव्या १५२ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर दोन जणांचा मृत्यू झाला असून गेल्या २४ तासांत १३५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.    

आजच्या या १५२ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या ५२,६८५ झाली आहे. यामध्ये १३०७ रुग्ण उपचार घेत असून ५०,३३६ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत १०४२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या १५२ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व - १७, कल्याण प - ४७, डोंबिवली पूर्व - ४३,डोंबिवली प - ३२, मांडा टिटवाळा - ६, मोहना - ४, तर पिसवली येथील ३ रूग्णांचा समावेश आहे. 

डिस्चार्ज झालेल्या रूग्णांपैकी १४ रुग्ण टाटा आमंत्रामधून,  १ रुग्ण पाटीदार कोविड सेंटरमधून, ३ रुग्ण डोंबिवली जिमखाना कोविड सेंटर मधून  व उर्वरित रुग्ण हे इतर रूग्णालयामधून तसेच होम आयसोलेशन मधून बरे झालेले आहेत.

कल्याण, ठाणे

प्रतिनिधी - कुणाल म्हात्रे 

___________