कल्याण डोंबिवलीत १४४ नवे रुग्ण तर ४ मृत्यू...| ५२,३८४ एकूण रुग्ण तर १०३९ जणांचा आतापर्यंत मृत्यू...| तर २४ तासांत ५९ रुग्णांना डिस्चार्ज...  

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज नव्या १४४ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर ४ जणांचा मृत्यू झाला असून गेल्या २४ तासांत ५९ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.    

कल्याण डोंबिवलीत १४४ नवे रुग्ण तर ४ मृत्यू...| ५२,३८४ एकूण रुग्ण तर १०३९ जणांचा आतापर्यंत मृत्यू...| तर २४ तासांत ५९ रुग्णांना डिस्चार्ज...   
144 new patients and 4 deaths in Kalyan Dombivali ... | 52,384 total patients and 1039 deaths so far ... | 59 patients discharged in 24 hours ...

कल्याण डोंबिवलीत १४४ नवे रुग्ण तर ४ मृत्यू...

५२,३८४ एकूण रुग्ण तर १०३९ जणांचा आतापर्यंत मृत्यू...

 तर २४ तासांत ५९ रुग्णांना डिस्चार्ज...

कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज नव्या १४४ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर ४ जणांचा मृत्यू झाला असून गेल्या २४ तासांत ५९ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.    

आजच्या या १४४ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या ५२,३८४ झाली आहे. यामध्ये १२५६ रुग्ण उपचार घेत असून ५०,०८९  रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत १०३९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या १४४ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व - २२, कल्याण प - ३५, डोंबिवली पूर्व - ४३, डोंबिवली प - ३९, तर  मांडा टिटवाळा येथील ५ रूग्णांचा समावेश आहे. 

डिस्चार्ज झालेल्या रूग्णांपैकी ४ रुग्ण टाटा आमंत्रामधून, ११ रुग्ण ह.भ.प. सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुल येथून, १ रुग्ण पाटीदार कोविड सेंटरमधून, ५ रुग्ण डोंबिवली जिमखाना कोविड सेंटर मधून  व उर्वरित रुग्ण हे इतर रूग्णालयामधून तसेच होम आयसोलेशन मधून बरे झालेले आहेत.

कल्याण, ठाणे

प्रतिनिधी - कुणाल म्हात्रे 

___________