कल्याण डोंबिवलीत  ५९ नवे रुग्ण तर १ मृत्यू...| ५१,१७२ एकूण रुग्ण तर १०२० जणांचा आतापर्यंत मृत्यू...| तर २४ तासांत १३० रुग्णांना डिस्चार्ज...

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज नव्या ५९  कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर एक  जणाचा मृत्यू झाला असून गेल्या २४ तासांत १३० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.    

कल्याण डोंबिवलीत  ५९ नवे रुग्ण तर १ मृत्यू...| ५१,१७२ एकूण रुग्ण तर १०२० जणांचा आतापर्यंत मृत्यू...| तर २४ तासांत १३० रुग्णांना डिस्चार्ज...
59 new patients and 1 death in Kalyan Dombivali ... | 51,172 total patients and 1020 deaths so far ... | 130 patients discharged in 24 hours ...

कल्याण डोंबिवलीत  ५९ नवे रुग्ण तर १ मृत्यू...

 ५१,१७२ एकूण रुग्ण तर १०२० जणांचा आतापर्यंत मृत्यू...

 तर २४ तासांत १३० रुग्णांना डिस्चार्ज...

 कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज नव्या ५९  कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर एक  जणाचा मृत्यू झाला असून गेल्या २४ तासांत १३० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.    

आजच्या या ५९  रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या ५१,१७२ झाली आहे. यामध्ये ११६४  रुग्ण उपचार घेत असून ४८,९८८ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत १०२० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या ५९ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व - १४,  कल्याण प - १७, डोंबिवली पूर्व - १२,  डोंबिवली प येथील १६ रूग्णांचा समावेश आहे. 

   डिस्चार्ज झालेल्या रूग्णांपैकी २२ रुग्ण टाटा आमंत्रामधून, ४ रुग्ण वै.ह.भ.प. सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुल येथून, ७ रुग्ण पाटीदार कोविड केअर सेंटरमधून, ५ रुग्ण डोंबिवली जिमखाना कोविड समर्पित रुग्णालयातून व उर्वरित रुग्ण हे इतर रूग्णालयामधून तसेच होम आयसोलेशन मधून बरे झालेले आहेत.

कल्याण, ठाणे

 प्रतिनिधी - कुणाल म्हात्रे 

___________