कल्याण डोंबिवलीत १३० नवे रुग्ण तर ३ जणांचा मृत्यू...| ५०,१९४ एकूण रुग्ण तर १००६ जणांचा आतापर्यंत मृत्यू...| तर २४ तासांत १३५ रुग्णांना डिस्चार्ज...

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज नव्या १३० कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर ३ जणांचा मृत्यू झाला असून गेल्या २४ तासांत १३५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 

कल्याण डोंबिवलीत १३० नवे रुग्ण तर ३ जणांचा मृत्यू...| ५०,१९४ एकूण रुग्ण तर १००६ जणांचा आतापर्यंत मृत्यू...|  तर २४ तासांत १३५ रुग्णांना डिस्चार्ज...
130 new patients and 3 deaths in Kalyan Dombivali ... | 50,194 total patients and 1006 deaths so far ... | 135 patients discharged in 24 hours ...

कल्याण डोंबिवलीत १३० नवे रुग्ण तर ३ जणांचा मृत्यू

५०,१९४ एकूण रुग्ण तर १००६ जणांचा आतापर्यंत मृत्यू

तर २४ तासांत १३५ रुग्णांना डिस्चार्ज

कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज नव्या १३० कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर ३ जणांचा मृत्यू झाला असून गेल्या २४ तासांत १३५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 

आजच्या या १३० रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या ५०,१९४ झाली आहे. यामध्ये १६५२ रुग्ण उपचार घेत असून ४७,५३६ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत १००६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या १३० रूग्णांमध्ये कल्याण पूर्व - ३३, कल्याण प - २४, डोंबिवली पूर्व - ५१, डोंबिवली प - १०, मांडा टिटवाळा - २, मोहना - ८, तर पिसवली येथील २ रूग्णांचा समावेश आहे. 

       डिस्चार्ज झालेल्या रूग्णांपैकी १० रुग्ण टाटा आमंत्रामधून, २ रुग्ण वै.ह.भ.प. सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुल येथून तर उर्वरित रुग्ण हे इतर रूग्णालयामधून तसेच होम आयसोलेशन मधून बरे झालेले आहेत.

कल्याण, ठाणे

 प्रतिनिधी - कुणाल म्हात्रे 

___________