कल्याण डोंबिवलीत कोरोना रुग्णांच्या संख्येने ओलांडला ५० हजारांचा टप्पा...

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांच्या संख्येने ५० हजारांचा टप्पा ओलांडला असून आज नव्या १३६ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर १ जणाचा मृत्यू झाला असून गेल्या २४ तासांत २१५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 

कल्याण डोंबिवलीत कोरोना रुग्णांच्या संख्येने ओलांडला ५० हजारांचा टप्पा...
The number of corona patients in Kalyan Dombivali has crossed the 50,000 mark ...

कल्याण डोंबिवलीत कोरोना रुग्णांच्या संख्येने ओलांडला ५० हजारांचा टप्पा...

१३६ नवे रुग्ण तर १ जणाचा मृत्यू

५०,०६४ एकूण रुग्ण तर १००३ जणांचा आतापर्यंत मृत्यू

तर २४ तासांत २१५ रुग्णांना डिस्चार्ज

कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांच्या संख्येने ५० हजारांचा टप्पा ओलांडला असून आज नव्या १३६ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर १ जणाचा मृत्यू झाला असून गेल्या २४ तासांत २१५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 

आजच्या या १३६ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या ५०,०६४ झाली आहे. यामध्ये १६६० रुग्ण उपचार घेत असून ४७,४०१ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत १००३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या १३६ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व-२६, कल्याण प - ४१, डोंबिवली पूर्व ३५, डोंबिवली प- २३, मांडा टिटवाळा - ९, तर मोहना येथील २ रूग्णांचा समावेश आहे. 

       डिस्चार्ज झालेल्या रूग्णांपैकी ३६ रुग्ण टाटा आमंत्रामधून, १३ रुग्ण वै.ह.भ.प. सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुल येथून, ४ रुग्ण आसरा फाउंडेशन स्कूल येथून, ३ रुग्ण पाटीदार कोविड केअर सेंटरमधून, २ रुग्ण शास्त्रीनगर रुग्णालयातून, २ रुग्ण डोंबिवली जिमखाना कोविड समर्पित रुग्णालयातून डिस्चार्ज झाले आहेत. तर उर्वरित रुग्ण हे इतर रूग्णालयामधून तसेच होम आयसोलेशन मधून बरे झालेले आहेत.

कल्याण, ठाणे

 प्रतिनिधी - कुणाल म्हात्रे 

___________